हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | नुकत्याच पार पडलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत एका पक्षाची ३ मते २१ कोटीत फुटली असा खळबळजनक दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी केला आहे. . तसेच प्रत्येक आमदाराला ७ कोटी रुपये देण्यात आले असेही त्यांनी म्हंटल. बारामती येथील एका कार्यक्रमात बोलत असताना त्यांनी हा आरोप केला आहे. मिटकरी यांच्या वक्तव्यानंतर हे तीन आमदार नेमके कोण याबाबत चर्चा सुरु झाल्या आहेत.
विधानपरिषद निवडणुकीत एका पक्षाची ३ मते २१ कोटीला फुटली. एकूण २७ मते द्यावी लागतात. २७ गुणिले ३ मी गुणाकार केला तर १६१ कोटी झाले. आपल्या जमिनीची किंमत ५ लाख एकर आहे. ४ एकर विकल्यावर २० लाख येतात. पैशांचा घोडेबाजार विधान परिषद निवडणुकीत झाला. आम्हालाही इतर पक्षांकडून गटनेते पदाची ऑफर देण्यात आली आहे. या बदल्यात एक मर्सडिज, दोन लाख रुपये महिना आणि वर दोन खोकी देऊत, अशी ऑफर देण्यात आल्याचेही मिटकरी म्हणाले.
जागतिक गणित तज्ञ म्हणून अमोल मिटकरी
यांची नोबेल पारितोषिकसाठी राष्ट्रवादीकडून नाव जाहीर.. 😅@amolmitkari22 pic.twitter.com/WDQzJ27eGp— Sadabhau Khot (@Sadabhau_khot) July 24, 2022
दरम्यान, यावेळी अमोल मिटकरी यांची हिशोब करताना चूक झाल्यांनतर रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी त्यांच्यावर निशाणा साधला. जागतिक गणित तज्ञ म्हणून अमोल मिटकरी यांची नोबेल पारितोषिकसाठी राष्ट्रवादीकडून नाव जाहीर असा टोला त्यांनी लगावला