विचार जमत नसेल तर तुम्ही एकमेकांना सोडा ; नवणीत राणांचा महाविकास आघाडीला टोला

Navneet Rana
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | औरंगाबाद शहराच्या नामकरणाच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडी मध्ये ठिणगी पडलेली आहे. एकीकडे औरंगाबादच्या नामकरणासाठी शिवसेनेकडून हालचाली सुरू असतानाच सत्तेतील वाटेकरी असलेल्या काँग्रेसने मात्र तीव्र विरोध दर्शविला आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये औरंगाबादच्या नामांतरावरून पुन्हा मतभेद समोर आले आहेत. त्यामुळे भाजपकडून सरकारला कोंडीत पडण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशातच आता अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी ठाकरे सरकावर जोरदार टीका केली आहे.

‘घरात जसं जावा आणि दिराचं भांडण असतं तसं सरकारचं सुरू आहे. जबरदस्तीने सरकारमध्ये राहणं आणि विचार न पटणं अशी अवस्था त्यांची झाली आहे, हे लोकांना स्पष्ट दिसत आहे,’ असं म्हणत नवनीत राणा यांनी सरकारवर हल्लाबोल केला. ‘विचार जमतं नसताना शिवसेना,काँग्रेस, राष्ट्रवादी पक्ष यांची युती झाली आहे. त्यामुळे विचार जमत नसेल तर तुम्ही एकमेकांना सोडा,’ असा सल्लाही खासदार नवनीत राणा यांनी महाविकास आघाडीला दिला आहे.

काँग्रेसची भूमिका काय ??

महाविकास आघाडीत काँग्रेस म्हणून आम्ही घटक पक्ष आहे, पण नामांतराला आमचा विरोध राहिल, असे थोरात यांनी स्पष्टपणे सांगितलंय. महाविकास आघाडीमध्ये कॉमन मिनिमम प्रोग्राम ठरलेला आहे, त्यामुळे जेव्हा नाव बदलासंदर्भात प्रस्ताव येईल, तेव्हा आमचा विरोध राहिल. पण, अद्याप तसा कुठलाही प्रस्ताव समोर नसल्याचंही थोरात यांनी स्पष्ट केलंय.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’