अमरावती : राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. कोरोनाचे संसर्ग वाढू नये यासाठी वारंवार मास्क घालण्याचे सरकारकडून आवाहन केले जात आहे. पण, अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्यासाठी कोरोना नियम नाहीत का? असा सवाल उपस्थित होत आहे.
खासदार नवनीत राणा यांनी मेळघाटात आदिवासी बांधवासोबत होळी निमित्त डान्स केला. सध्या त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. खासदार असूनही नवनीत राणा यांना कोरोनाचे निर्बंध माहीत नाहीत का असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
दरम्यान राज्यात कोरोनाने विस्फोट केला असून रविवारी तब्बल 40 हजार पेक्षा जास्त रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. अशा वेळी नवनीत राणा यांचा विनामास्क डान्स टीकेच लक्ष्य बनत आहे.
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी हॅलो महाराष्ट्र सोबत जोडले जा. आम्हाला फॉलोअ करा WhatsApp Group | Facebook Page