अमरावती : राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या ही झपाट्याने वाढत असल्याचे दिसून येत आहे. 14 एप्रिल पासून राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे ‘ब्रेक द चेन’ ही मोहीम देखील हाती घेण्यात आली आहे. मात्र अजूनही लोक विनाकारण रस्त्यांवर फिरताना दिसत आहेत. अशातच एक दिलासादायक बाब समोर आली आहे म्हणजे अमरावती मध्ये करुणा रुग्णांच्या वाढीचा वेग मंदावला आहे.
फेब्रुवारी महिन्यात अमरावती जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या व मृत्यू संख्याही झपाट्याने वाढत होती. जिल्ह्यात 14 दिवस पूर्णपणे लॉकडाऊन करण्यात आला होता. त्यामुळे अमरावती जिल्हा हा राज्यातच नव्हे तर देशात कोरोनाचा हॉटस्पॉट झाला होता. अनलॉक नंतर देशातील पहिला लॉकडाऊन हा अमरावतीला लागला होता. मात्र अमरावती करांनी लॉकडाऊन चे चांगलेच पालन केल्याने कोरोना रुग्णसंख्येचा वेग मंदावला होता. जिल्ह्यात करोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी उपस्थित राहून जिल्ह्यातील महत्त्वाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली.
या बैठकीत जिल्ह्यातील मनपा क्षेत्रात अचलपूर तालुक्यात सुरुवातीला एक आठवड्यांसाठी लॉकडाऊनची घोषणा केली. तर पुढे आणखी सात दिवस लॉक डाऊन वाढवण्यात आला. म्हणजे एकूण चौदा दिवस लॉक डाऊन करण्यात आले होते. नंतर इतर तालुक्यात सुद्धा लॉकडाऊन करण्यात आले. यात अत्यावश्यक सेवा वगळता सगळ्या बाजारपेठा बंद होत्या तर चाचण्या सुरुवाती प्रमाणे सुरूच होत्या. अमरावती पॅटर्नचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुद्धा कौतुक केले होते.
फेब्रुवारी महिन्यात 22 ते 28 तारखे दरम्यान 5593 रुग्ण संख्या सरासरी होती तर महिन्याभरानंतर 22 ते 30 मार्च दरम्यान रुग्णसंख्या 2981 वर आले होते रुग्णसंख्या तर कमी झालेत मृतांचा प्रमाण सुद्धा कमी झालं होतं.
ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.