अमरावती : हॅलो महाराष्ट्र – अमरावतीमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये अमरावतीच्या चांदुर बाजार तालुक्यातील फुबगाव येथे अचानक पावसाच्या पाण्यामुळे घराची भिंत कोसळल्याने (amravati wall collapse) एकाच परिवारातील पाच जण त्याखाली दबले गेले. या दुर्घटनेत मायलेकीचा मृत्यू झाला तर तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. गावकऱ्यांनी या तिघांना ढिगाऱ्यातून बाहेर काढून (amravati wall collapse) त्यांना उपचारासाठी अमरावती या ठिकाणी दाखल करण्यात आले. या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली आहे.
संपूर्ण संसार कोलमडला !
अमरावतीमधील चांदूर बाजार तालुक्यातील फुबगावातील वैराळे कुटुंबीयांवर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे. यामध्ये मुसळधार पावसामुळे वैराळे कुटुंबाच्या घराची विटा आणि मातीची भिंत कोसळून (amravati wall collapse) मोठी दुर्घटना घडली.या दुर्घटनेत घरातील पाचही जण भिंतीखाली दबले गेले. त्यात चंदा वैराळे आणि पायल वैराळे यांचा जागीच मृत्यू झाला. तर नाराय़ण वैराळे, अरुण वैराळे आणि ओम वैराळे हे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.
चांदुर बाजार तालुक्यातील फुबगाव सैदापूर या ठिकाणी हि दुर्घटना घडली. मंगळवारी सकाळी पाच वाजण्याच्या सुमारास हि दुर्घटना (amravati wall collapse) घडली आहे. पहाटे घडलेल्या या घटनेच्या वेळी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी कोणतीही संधी या दुर्घटनेत वैराळे कुटुंबाला मिळाली नाही. या घटनेची माहिती मिळताच तातडीने बचावपथक घटनास्थळी दाखल झाले. या दुर्घटनेमुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
हे पण वाचा :
“देवेंद्रजी मुख्यमंत्री होणार नाहीत, मला माहिती होतं”, अमृता फडणवीस यांचे मोठे विधान
आमदार शहाजी बापू पाटील यांनी कार्यकर्त्यांसोबत धरला ठेका, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
खरे खंडणी बहाद्दर राष्ट्रवादीचे शशिकांत शिंदे : आ. महेश शिंदे
नांदेडमध्ये खंडणीप्रकरणी काँग्रेस नगरसेवकाच्या मुलाला अटक, तर शिवसेनेचा माजी नगरसेवक फरार