बापाच्या समोर मुलीचे केले अपहरण; जबरदस्तीने कारमध्ये बसवलं अन्…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हैदराबाद : वृत्तसंस्था – तेलंगणातील राजन्ना सिरसिल्ला जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका 18 वर्षीय मुलीचे तिच्या वडिलांसमोर काही अज्ञात चोरट्यांनी अपहरण (kidnapped) केले. हि संपूर्ण अपहरणाची (kidnapped) घटना त्या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. ही घटना चंदुर्थी तालुक्यातील मुडेपल्ले गावामध्ये घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

काय आहे व्हिडिओमध्ये?
व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, एक अज्ञात व्यक्ती चेहरा लपवत थेट तरूणीला धरत पळवून (kidnapped) नेण्याचा प्रयत्न करत असतो यामध्ये ती तरूणी पळून जाण्याचा प्रयत्न करते, पण चोरटा तिला जबरदस्तीने गाडीत ओढतो. त्यानंतर गाडीचा दरवाजा बंद करतो. वडील त्या गाडीच्या मागे धावू लागतात पण चोरटे पळून जात असल्याचे या व्हिडिओमध्ये स्प्ष्टपणे दिसत आहे.

हि घटना घडल्यानंतर या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. या घटनेचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आम्ही त्यांचा शोध घेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत. या घटनेत चार जणांचा (kidnapped) समावेश आहे. तसेच मागच्या काही महिन्यांपूर्वी सज्ञान असताना ही तरुणी प्रियकरासोबत पळून गेली होती. आता या तरुणीला 18 वर्षे पूर्ण झाली आहेत. तो (तिचा प्रियकर) तिला घेऊन गेला असावा असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. या आरोपींना पकडण्यासाठी तीन पथके तयार करण्यात आली असल्याची माहिती डीएसपी नागेंद्र यांच्याकडून देण्यात आली आहे.

हे पण वाचा :
संजय राऊत होणार भारत जोडो यात्रेत सहभागी; घेणार राहुल गांधींची भेट
सुप्रिया सुळेंकडून शिंदे गटातील आमदाराचे कौतुक; ट्वीट करत म्हणाल्या…
ठाकरे गटाचे आणखी 3 खासदार आणि 8 आमदार शिंदेंच्या संपर्कात, ‘या’ खासदाराचा मोठा दावा
50 आमदारांच्या गुवाहाटी दौऱ्याची तारीख ठरली !; ‘या’ दिवशी जाणार कामाख्या देवीच्या दर्शनाला
भगतसिंग कोश्यारी यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया; म्हणाले…..