Sunday, March 26, 2023

सुप्रिया सुळेंकडून शिंदे गटातील आमदाराचे कौतुक; ट्वीट करत म्हणाल्या…

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिंदे गटातील आमदारांकडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर वारंवार टीका केली जात आहे. शिंदे गटाचे आमदार अब्दुल सत्तार यांनी काहीच दिवसांपूर्वी राष्ट्रवादी खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. मात्र, आता सुप्रिया सुळे शिंदे गटातील आमदाराचे कौतुक केले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी अवमानकारक वक्तव्य केले त्या विरोधात शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी आक्रमक भूमिका घेतली. त्याबद्दल सुळे यांनी ट्विट करत त्यांचे कौतुक केले आहे.

सुप्रिया सुळे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटले आहे की, प्रत्येक स्वाभिमानी मराठी माणूस छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान सहन करुच शकत नाही. शिवरायांचा अवमान करणाऱ्यांच्या विरोधात पक्ष, गट-तट आदी विसरुन सर्वांनी एकत्र आलं पाहिजे. अवमान करणाऱ्यांच्या विरोधात नफा-नुकसान विसरुन ठामपणे उभा राहण्याची हिंमत दाखविण्याचे काम आमदार गायकवाड यांनी केले आहे, याबद्दल आम्ही सर्वजण त्यांचे अभिनंदन करतो, असे ट्विट सुळे यांनी केले आहे.

- Advertisement -

दरम्यान, सुप्रिया सुळे यांच्या या ट्विटची राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे.
राज्यपाल भगत सिंह कोश्यारी आणि भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्यामुळे राज्यपाल कोश्यारी आणि सुधांशू त्रिवेदी यांच्या विरोधात सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. त्यांच्यावर मोठया प्रमाणात टीका सुद्धा होते आहे.

अशासतच शिंदे गटाचे बुलडाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी सुद्धा राज्यपाल भगत सिंह कोश्यारी आणि भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांचा कठोर शब्दांत समाचार घेतला. शिवाजी महाराजांचा वारंवार अपमान होत असेल तर चांगले नाही. अशाने पक्षात वितुष्ट निर्माण होईल आणि त्याचा परिणाम दोघांनाही भोगावा लागेल,असा थेट इशारा संजय गायकवाड यांनी दिला आहे.