सांगली प्रतिनिधी I प्रथमेश गोंधळे
सांगलीच्या कवठेमहांकाळ तालुक्यातील जांभुळवाडी परिसरामध्ये दुपार पासून गवा रेडा फिरत आहे. त्यामुळे गावात आणि परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. दुपार पासून गव्याला रेस्क्यू करण्यासाठी वनक्षेत्रपाल वनपाल वनरक्षक यांचा जांभुळवाडी उसाच्या फडाला घेराव घालून गव्याला ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तसेच जांभुळवाडी ढालगाव आजूबाजूच्या शेतकऱ्यांना सुचविण्यात आलेले आहे.
भीउन जाऊ नका गव्याला मारू नका असे आव्हान क्षेत्रपाल युवराज पाटील यांनी केले आहे. हा गवा रेडा सुरेश गोविंद सरक यांच्या उसाच्या फळांमध्ये गेला असून गव्याला रेस्क्यु करण्याचे काम चालू आहे. अद्याप गवा उसाच्या फडातून बाहेर आलेला नाही. दरम्यान, सांगली जिल्ह्यात सर्वत्र आता गावाची दहशत पाहायला मिळत आहेत. त्यामुळे जीवितहानी टाळण्यासाठी नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन वन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.