सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
सातारा शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या खंडोबाचा माळ परिसरातील विहिरीत एका वृध्द महिलेने उडी मारुन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. रात्री 11 वाजता आजारपणाला कंटाळून महिलेने आत्महत्या केल्याची प्राथमिक माहीती समोर येत आहे.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, शनिवारी 11 वाजण्याच्या सुमारास खंडोबाचा माळ परिसरातील विमल अंकुशराव दरेकर (रा. पंताचा गोठ) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. प्राथमिक माहिती नुसार संबधित महिलेने आजारपणाला कंटाळुन हि आत्महत्या केली असल्याचे समजत आहे.
सदरील घटनेची माहिती मिळताच श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे ट्रेकर्सच्या सदस्यांनी विहिरीत दुपारी दोन नंतर शोधमोहिम सुरु केली. शनिवारी रात्री 12 वाजण्याच्या सुमारास संबधित महिलेचा मृतदेह विहिरीतुन शोधुन काढण्यात ट्रेकर्सना यश आले. या घटनेची नोंद रविवार पेठ पोलीस चौकीत झाली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा
Click Here to Join Our WhatsApp Group