सचिन वाझेचा धनी अनिल देशमुख, पण देशमुख यांचा धनी कोण ; पडळकरांचा सवाल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांच्याविरोधात CBI ने FIR दाखल केला आहे. 100 कोटींची खंडणी वसूल करण्याच्या प्रकरणात सीबीआयने देशमुखांविरोधात एफआयआर दाखल केला आहे.  यावरून आता भाजपने पुन्हा एकदा महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला आहे. सचिन वाझेचा धनी अनिल देशमुख आहे पण देशमुख यांचा धनी कोण असा सवाल त्यानी केला आहे.

गोपीचंद पडळकर यांनी म्हटले की, ‘मा. न्यायालयाच्या निर्देशानुसार CBI ने या वसूलीसरकारचे माजी गृहमंत्री अनिल देशमुखांवर एफआयआर दाखल केले. हे तर जगजाहिर झाले आहे की, सचिन वाझेचा धनी अनिल देशमुख आहे आता फक्त एकच प्रश्न देशमुखांचा धनी_कोण?’ असा सवाल पडळकर यांनी केला. यावेळी त्यांचा रोख हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वर दिसत आहे.

खरा सचिन वाझे मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर होता की सिल्वर ओकवर?

दरम्यान, एका अनिलवर कारवाई पुरेशी नाही. खरा सचिन वाझे मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर होता की सिल्वर ओकवर?, असा सवाल अतुल भातखळकर यांनी विचारला आहे .खंडण्या वसूल करणारा खरा सचिन वाझे कोण हे आता उघड होईलच असे अतुल भातखलकर यांनी म्हंटल.

ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.

Leave a Comment