सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
फलटण तालुक्यातील मिरेवाडी येथील दोन गटात रस्त्याच्या झालेल्या वादावादीत एकावर तलवारीने हल्ला झाल्याची घटना रविवारी घडली. या हल्ल्यात एकजण गंभीर जखमी झाला असून घराला, गोठ्याला तसेच वाहनांना पेटवून देण्याचा गंभीर प्रकार घडला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, रविवारी सकाळी ११:३० वाजण्याच्या सुमारास मिरेवाडी गावच्या हद्दीत जमीन गट नं १० मध्ये विनोद यांच्या घराचे बांधकाम चालू होते. त्यावेळी गावातील तुषार नामदेव धुमाळ, विराज नामदेव धुमाळ ,सुनील महादेव धुमाळ ,नामदेव गणपत धुमाळ, सुनील महादेव धायगुडे, शुभम शरद कोकरे, अक्षय दुर्योधन ठोंबरे, बाळासाहेब जयराम कोकरे , मोहन आण्णा ठोंबरे , दत्तात्रय सोपान धायगुडे , प्रथमेश लक्ष्मण धायगुडे , राहुल बापू कोळपे , सोमनाथ महादेव धायगुडे , अक्षय सुनील धायगुडे , जालिंदर विठ्ठल खरात , विठ्ठल गोविंद खरात, भाऊसो अंकुश कोकरे , भरत जयराम कोकरे , अनिकेत जालिंदर खरात व वैभव बाळासाहेब कोकरे (सर्व रा. मिरेवाडी ता फलटण जि सातारा) यांनी बेकायदा जमाव जमवून हातात काठ्या घेऊन आले.
यावेळी संबंधितांनी विनोद यास “तुम्ही घराचे बांधकाम करायचे नाही असे म्हणून शिवीगाळ दमदाटी करून घराचे नवीन बांधकाम हाताने पाडले. यावेळी याचा जाब विचारन्यायासाठी विनोद व त्याची पत्नी शीतल, भावजय रुपाली , आई बायडाबाई गेले असता संबंधितांनी त्यांना मारहाण करून शिवीगाळ दमदाकेली. याची फिर्याद विनोद यांनी लोणंद पोलीस ठाण्यात दिली आहे.
मिरेवाडीत एकावर तलवारीचा हल्ला; एकजण गंभीर घर, वाहने पेटवण्याचा प्रकार pic.twitter.com/JzZfOBt7D9
— santosh gurav (@santosh29590931) March 6, 2023
तर सुनील महादेव धायगुडे (रा. मिरेवाडी ) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मिरेवाडी येथील थोरात रस्त्याचे असलेल्या जागेवरून नामदेव धुमाळ व विनोद रुपनवर यांच्यात वाद सुरू असताना संतोष कांतीलाल शेळके, निलेश भाऊसो शेळके ,अक्षय सुरेश रुपनवर , शुभम दीपक नरुटे , विशाल सतीश नरुटे , रोहित गणपत रुपनवर , अभिषेक सुरेश रुपनवर , महादेव भारत रुपनवर , किरण ज्ञानेश्वर रुपनवर , शंकर नामदेव रुपनवर ,गौरव शंकर रुपनवर , बाळू दिनकर नरुटे , सतीश दिनकर नरुटे , भागूजी साहेबराव पिसाळ, अभिजित गोरख मोरे , युवराज बाळासो ठोंबरे , इंद्रजीत शेखर नरुटे , अनिल तुकाराम रुपनवर , मयूर संजय रुपनवर, निलेश विठ्ठल रुपनवर , उमेश विठ्ठल रुपनवर आणि प्रीतम अधिक कोरडे (सर्व रा. मिरेवाडी व कुसुर ता. फलटण) यांनी बेकायदेशीर जमाव जमवून सुनील धायगुडे यांच्या शेजारी राहणारे नामदेव गणपत धुमाळ, आशा नामदेव धुमाळ, सायली नामदेव धुमाळ, विराज नामदेव धुमाळ, तुषार नामदेव धुमळ तसेच चालक जय बहादूर बीष्ट यांना हाताने लथाबुक्यांनी तसेच काठीने व रॉडने मारहाण केली. तसेच त्यांचे राहते घर, पिकअप, स्कुटी, दोन ट्रॅक्टर, धान्य, जनावरांचा गोठा पेटवून दिला.
दोन्ही गटात झालेल्या वादावादीप्रश्नी जितेंद्र एकनाथ जाधव (रा. कुसुर ता. फलटण) यांनी लोणंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी फिर्यादीत म्हंटले आहे की, बाळू पाटलाचीवाडी (ता. खंडाळा) गावच्या हद्दीत थोरात मिस्त्री यांच्या फॅब्रिकेशन दुकानासमोर दूपारी ३ वाजण्याच्या सुमारास अमोल शेळके व अक्षय खताळ उभे असताना त्या ठिकाणी टीलु उर्फ तुषार नामदेव धुमाळ, विराज नामदेव धुमाळ, नामदेव गणपत धुमाळ (रा. मिरेवाडी, ता. फलटण) व इतर अनोळखी ९ लोकांनी बेकायदेशीर जमाव जमवून टीलु धुमाळ याने अमोल शेळके याच्या हातावर तलवारीने वार केला. तर इतर लोकांनी दंडक्याने व लथाबुक्यांनी पाठीवर, छातीवर व हाताला मारहाण करून गंभीर जखमी केले.
संबंधित दोन्ही कुटूंबियांची परस्पर विरोधी फिर्यादीनंतर घटनास्थळी फलटणचे उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे, सपोनि विशाल वायकर यांनी भेट देऊन पाहणी केली. तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून लोणंद पोलिसांकडून घटनास्थळी बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे.