Bank Of Baroda ची जबरदस्त ऑफर! गृहकर्ज झाले स्वस्त, प्रक्रिया शुल्कही माफ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । होळीच्या निमित्ताने सार्वजनिक क्षेत्रातील Bank Of Baroda ने ग्राहकांसाठी जबरदस्त ऑफर आणल्या आहेत. यावेळी बँकेकडून ग्राहकांना होम लोनवर सूट देण्याची घोषणा करण्यात आली आहे. मात्र, ही ऑफर फक्त मर्यादित काळासाठीच उपलब्ध असेल. ज्या अंतर्गत कमी व्याजदरासहीत प्रोसेसिंग फी मध्ये देखील सूट देण्यात आली आहे.

Bank Of Baroda Reduces Home Loan Interest Rates By 25 Basis Points To 8.25%

आता Bank Of Baroda ने आपल्या होम लोनवरील व्याजदर 40 बेसिस पॉइंट्सनी कमी करून 8.5 टक्क्यांवर आणला आहे. तसेच, बँकेकडून एमएसएमई कर्जांवरील व्याजदरही 8.40 टक्के केला आहे. कर्ज देणाऱ्या इतर बँकांच्या तुलनेत हा व्याजदर खुंतोच कमी असल्याचा दावा देखील बँकेने केला आहे.

StanChart launches interest only home loan facility

प्रोसेसिंग फी केली कमी

Bank Of Baroda कडून कर्जावरील व्याजदरात कपात करण्याबरोबरच त्यावरील प्रोसेसिंग फीमध्येही मोठी सूट दिली जाते आहे. एका खास ऑफर अंतर्गत, बँकेकडून होम लोनवरील प्रोसेसिंग फीवर 100% सवलत आणि MSME कर्जावर 50% सूट दिली जाते आहे. मात्र, कर्ज मिळविण्यासाठी आपला क्रेडिट स्कोअर चांगला असावा लागेल. हे जाणून घ्या कि, 750 पेक्षा जास्त क्रेडिट स्कोअर हा चांगला मानला जातो. यामध्ये आपला क्रेडिट स्कोअर जितका जास्त असेल बँकेकडून तितक्या कमी व्याजदरावर कर्ज मिळेल.

Bank of Baroda Home Loan: Bank of Baroda hikes home loan interest rates: Check details here - The Economic Times

ही ऑफर किती दिवसांसाठी उपलब्ध असेल?

हे जाणून घ्या कि, ही ऑफर बँकेकडून मर्यादित कालावधीसाठीच दिली जाते ​​आहे. आपल्या निवेदनात बँकेने म्हटले की, ही ऑफर ग्राहकांसाठी 5 मार्च 2023 ते 31 मार्च 2023 पर्यंतच व्हॅलिड असेल. सध्याच्या काळात बाजारात कर्जाची मागणी खूपच वाढली आहे. ज्यामुळे अधिकाधिक ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी बँकांकडून अनेक प्रकारच्या ऑफर दिल्या जात आहेत. Bank Of Baroda नेही कर्जावरील व्याजदरात सूट देण्यासाठी ही खास ऑफर जाहीर केली आहे.

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.bankofbaroda.in/personal-banking/loans/home-loan/baroda-home-loan

हे पण वाचा :
Stock Market मध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी ‘या’ 7 शब्दांचा अर्थ जाणून घ्या
7th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर !!! होळीनंतर वाढणार इतका पगार
Multibagger Stock : कंप्रेसर बनवणाऱ्या ‘या’ कंपनीने गुंतवणूकदारांना दिला कोट्यवधींचा नफा
Reels बनवणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी !!! Facebook ने वाढवली व्हिडिओच्या वेळेची मर्यादा
धक्कादायक !!! American Airlines च्या विमानामध्ये मद्यधुंद अवस्थेतील प्रवाशाने सहप्रवाशावर केली लघवी