Satara News : साताऱ्यात भर दिवसा गोळीबार; एक कामगार जखमी

gun firing Satara
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
सातारा जिल्ह्यात सध्या गोळीबाराच्या घटना घडत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पाटण येथील गोळीबाराची घटना ताजी असताना आज पुन्हा सातारा तालुक्यात गोळीबाराची घटना घडली. यामध्ये एक कामगार जखमी झाला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पुणे-बंगळुरू महामार्ग लगत शेंद्रे (ता. सातारा) येथील प्रसिद्ध प्रियंका शू-मार्टमध्ये एका ग्राहकाकडून गोळीबार झाल्याचा प्रकार घडला. यावेळी गोळीबारात कामगाराच्या पायाला गोळी लागल्याने तो जखमी झाला. या घटनेची माहिती सातारा पोलीसांना मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.

यावेळी पोलिसांनी गोळीबाराबाबत चौकशीही केली असता अनावधानाने गोळी बंदुकीतून सुटली असल्याचे संबंधिताने सांगितले. बंदुक ठेवण्याच्या पॉकेटच्या लेदरचे काम करताना घटना घडली असून संबंधितांकडे बंदुकीचा परवाना असल्याची माहिती पोलिसांनी दिली. तसेच जखमी उलफिद युसुफ खान (रा. शेंद्रे) या कामगारास उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.