औरंगाबाद – क्रिकेट सामन्यावर ऑनलाइन बेटिंग करून सट्टारॅकेट चालविणाऱ्या टोळीचा गुन्हेशाखेच्या पथकाने भांडाफोड करीत आठ आरोपीच्या वाळूज औधोगिक परिसरातून मुसक्या आवळल्या त्यांच्या ताब्यातून अनेक मोबाईल रोख पोलिसांनी जप्त केली असून या रॅकेट मध्ये सामील असलेल्याच्या बँक खात्याची चौकशी करून दोषी आढळणाऱ्यावर कठोर कारवाई करण्यात येईल अशी माहिती पोलीस आयुक्त डॉ.निखिल गुप्ता यांनी पत्रकारांना संवाद साधताना दिली.
विविध क्रिकेट सामन्यावर ऑनलाइन पद्धतीने बेटिंग करून सट्टा घेतला जात असल्याची माहिती गुन्हेशाखेच्या पथकाला मिळाली होती.या माहितीच्या आधारे पथकाने सापळा रचून वाळूज औधोगिक वसाहतीत छापा टाकत आठ आरोपीच्या मुसक्या आवळल्या. त्यांच्या ताब्यातून अनेक मोबाईल, रोख रक्कम, पोलिसांनी जप्त केली आहे. वृत्तदेईपर्यंत या प्रकरणाची आरोपींची नावे समोर आली न्हवती. जुगार खेळविणारे आणि खेळणारे दोघेही कायद्याच्या दृष्टीने तेवढेच दोषी आहे.
या प्रकरणाची व्याप्ती तपासात आहोत.ज्या बँक खात्यावर देवाण घेवाण होत होती. त्या खात्याची माहिती घेऊन दोषी आढळणाऱ्या वर कठोर कारवाई करण्यात येईल. अशी माहिती पोलीस आयुक्त डॉ.निखिल गुप्ता यांनी दिली.