आनंदराव अडसूळ यांना दुसऱ्या रुग्णालयात हलवले; ईडीचे अधिकारीही सोबत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ईडीच्या रडारावर असलेले शिवसेनेचे नेते आणि माजी खासदार आनंदराव अडसूळ यांना दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे. अडसूळ यांना लाईफ लाईन रुग्णालयातून गोरेगाव येथील SVS रुग्णालयात हलवले आहे. त्यांच्या सोबत कुटुंबीय आणि काही ED चे अधिकारी असल्याची माहिती आहे.

आनंदराव अडसूळ यांच्या राहत्या घरी आणि कार्यालयावर 27 सप्टेंबरला ईडीच्या अधिकाऱ्यांनी धाडी टाकल्या. ईडीचे अधिकारी चौकशी करत असतानाच आनंदराव अडसूळ यांची तब्येत बिघडली. त्यांना लगोलग गोरेगावच्या लाईफलाईन केअरमध्ये अॅडमिट करण्यात आलं. गेल्या 4 दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. पण तब्येतीत फरक पडत नसल्याने त्यांना दुसऱ्या रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

ईडी ची कारवाई कशासाठी –

आंनदराव अडसूळ यांनी सिटी को-ऑप बँकेत घोटळा केल्याचा आरोप आमदार रवी राणा यांनी 5 जानेवारी रोजी केला होता. आनंदराव अडसूळ सिटी बँकेचे अध्यक्ष असताना त्यांच्या कार्यकाळात बँकेत 900 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आहे. “सिटी को-ऑप बँकेच्या मुंबईमध्ये 13-14 शाखा आहेत. या बँकेत 900 खातेदार आहेत. ही बँक बुडण्यास अनधिकृतरित्या वाटलेली कर्ज कारणीभूत आहे,” असा आरोप रवी राणांनी केला होता

Leave a Comment