आनंदराव अडसूळ यांची तब्बेत बिघडली; लाईफकेअर हॉस्पिटलमध्ये दाखल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना नेते आणि अमरावतीचे माजी खासदार आनंदराव अडसूळ याना ईडीची नोटीस आल्यानंतर त्यांची तब्बेत खालावली आहे. यानंतर त्यांना लाईफलाईन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. सिटी बँक घोटाळ्याप्रकरणी आमदार रवी राणा यांनी ईडीकडे अडसुळांविरोधात तक्रार केली होती.

आज 4 तासांहून अधिक काळ आनंदराव अडसूळ यांची चौकशी करण्यात येत होती. ईडीचे चार अधिकारी आनंदराव अडसूळ यांच्या घरी पोहोचले होते. चौकशी दरम्यान आनंदराव अडसूळ यांची तब्येत बिघडली असून गोरेगाव येथील रुग्णालयात नेण्यात असल्याची माहिती आहे.

काय आहे प्रकरण-

आंनदराव अडसूळ यांनी सिटी को-ऑप बँकेत घोटळा केल्याचा आरोप आमदार रवी राणा यांनी 5 जानेवारी रोजी केला होता. आनंदराव अडसूळ सिटी बँकेचे अध्यक्ष असताना त्यांच्या कार्यकाळात बँकेत 900 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आहे. “सिटी को-ऑप बँकेच्या मुंबईमध्ये 13-14 शाखा आहेत. या बँकेत 900 खातेदार आहेत. ही बँक बुडण्यास अनधिकृतरित्या वाटलेली कर्ज कारणीभूत आहे,” असा आरोप रवी राणांनी केला होता.

You might also like