अमित शाह म्हणजे गजनी, शिवसेना खासदारांचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजप तसेच केंद्रीय भाजप नेत्यांवर अनेक मुद्यांवरून विरोधकांकडून जोरदार टीका होते. दरम्यान नुकतीच शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर निशाणा साधत जोरदार टीका केली आहे. भाजपला ‘गजनी’सारखा झटका येतो आणि अमित शाह हे गजनी आहेत, अशा शब्दात सावंत यांनी हल्लाबोल केला आहे.

रायगडमध्ये आज शिवसेना पक्षाचा एक कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमप्रसंगी शिवसेना खासदार सावंत यांनी गृहमंत्री अमित शाहांवरच निशाणा साधला. यावेळी सावंत म्हणाले की, मैने ऐसे कोई बोला नही था, हा गजनीचा झटका त्यांना येतो. अमित शाह गजनी असेल, पण उद्धवजी मात्र रामशास्त्री बाण्याचं काम करणारे आमचे नेतृत्व आहे हे लक्षात ठेवा, शिवसेना-भाजपच्या युतीबाबत सांगायचे झाले तर भाजपने दिलेला शब्द पाळला नाही.

सध्या महाविकास आघाडी सरकारमध्ये फूट होत असल्याचे सर्वत्र भाजपकडून सांगितले जात आहे. तर आघाडी सरकारमध्ये एखाद्या नेत्याने आघाडीतीलच कोणाबाबत वक्तव्य केले तर त्यावर भाजपच्या नेत्यांकडून लगेच प्रतिक्रिया दिली जात आहे. अशात शिवसेना व भाजप यांच्यात पुन्हा युती होणार असल्याचेच भाजप नेत्यांकडून भासविले जात आहे. या दरम्यान आज शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी भाजपचे केंद्रीयमंत्री अमित शाह यांच्याबाबत वक्तव्य केले असल्याने भाजप शिवसेना नवा वाद पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

You might also like