हॅलो महाराष्ट्र। भाजपचे माजी केंद्रीय मंत्री अनंतकुमार हेगडे यांनी महात्मा गांधींबाबत एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. ”महात्मा गांधी यांचा स्वातंत्र्य लढा हे एक ढोंग होतं. अशा लोकांना भारतात महात्मा कसं काय संबोधलं जातं?” असाही प्रश्न हेगडे यांनी उपस्थित केला.
एवढंच नाही तर ” देश स्वतंत्र होण्यासाठी जी स्वातंत्र्य चळवळ ती इंग्रजांच्या साथीने चालवण्यात आली होती. या चळवळीत नेते म्हणवणाऱ्या एकालाही लाठी खावी लागली नाही. त्यामुळे अशा लोकांची स्वातंत्र्य चळवळ हेच एक मोठं नाटक होतं. ब्रिटिशांची संमती घेऊन उभं केलेलं एक ढोंग होतं. ही तडजोडीची स्वातंत्र्य चळवळ होती. महात्मा गांधी यांनी केलेली उपोषणं आणि आंदोलनं हेदेखील नाटक होतं.” असंही हेगडे यांनी म्हटलं आहे.
ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.
हे पण वाचा-
आमदार प्रशांत बंब यांची खासदार चिखलीकरांना मानहानीची नोटीस; माफी मागा अन्यथा २३ कोटींचा दावा करू
माघी यात्रेसाठी पंढरपूरात लाखो भाविक दाखल; कोरोना व्हायरस उपचारासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन
लोकप्रिय मालिका ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ लवकरचं प्रेक्षकांची रजा घेणार