टीम हॅलो महाराष्ट्र । आपल्या नेत्याप्रती एखाद्या कार्यकर्त्यांचं प्रेम किती असू शकत याचं उत्तम उदाहरण कर्जत-जामखेड मदारसंघात पाहायला मिळालं. कर्जत-जामखेड मतदारसंघातून विधानसभेला रोहित पवार निवडून आले, तरच पायात चप्पल घालीन, नाहीतर पाच वर्षे अनवाणी राहीन, अशी शपथ राशीन येथील उद्धव अंबादास शेटे तरुणानं घेतली होती. मतदान पार पडले आणि निकालानंतर रोहित पवार मोठ्या मताधिक्याने विजयी होत आमदार झाले. मात्र, तरीही उद्धवने पायात चप्पल घातलीच नाही. आता चप्पल घालेल ‘ती’ रोहित दादांच्या हातूनच असं म्हणत उद्धव तसाच अनवाणी चालत राहिला. मात्र, अखेर दोन महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर ती वेळ आली. आणि खुद्द आमदार रोहित पवार यांनी उद्धवला नवी कोरी चप्पल भेट देत त्याची शपथ पूर्ण केली.
अन उद्धवनं घेतली अनवाणी राहण्याची शपथ
महाराष्ट्रात विधानसभेचा प्रचार रंगात आला होता. महाराष्ट्रातील अनेक विधानसभा जागांवर दिग्गजांनी आपली शक्ती पणाला लावली होती. कर्जत-जामखेड मतदारसंघ त्याला अपवाद नव्हता. रोहित पवार आणि भाजप मंत्री राम शिंदे यांच्यातील लढतीवर संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून होते. या दोघांपैकी नेमकं कोण निवडणूक जिंकेल याबाबत मतदारसंघात उत्सुकता लागली होती. त्यात दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांनी निवडणूक प्रचारात स्वतःला झोकून दिल होत. त्यातलाच एक कार्यकर्ता म्हणजे राशीन येथील शेटेवस्ती राहणार उद्धव अंबादास शेटे. रोहित पवार यांचाचं विजय होईल असा दृढ विश्वास असणाऱ्या उद्धवने विधानसभा निवडणुकीत रोहित पवार निवडून आले, तरच आपण पायात चप्पल घालू अन्यथा पाच वर्षे अनवाणी राहू, अशी प्रतिज्ञाच त्याने मित्रमंडळीसोबत राशीनच्या मुख्य रस्त्यावर केली होती. निवडणूक जशी रंगात आली, तशी या पवार समर्थक कार्यकर्त्यांची चर्चाही राशीनमध्ये रंगली होती.
दरम्यान, रोहित पवार यांना उद्धवच्या शपथेची कल्पना होती. मात्र, निवडणूक जिकल्यानंतर उद्धवला भेटण्याचा योग्य काही जुळत नव्हता. अखेर दोन महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर शेटे यांची राशीन येथे एका खासगी कार्यक्रमात पवार यांच्याशी भेट झाली. पवार यांनाही शेटे यांनी केलेल्या पणाची कल्पना होती. त्यांनी तातडीने शेटे यांच्यासाठी नवी कोरी चप्पल मागविली. शेट यांना भेट देत ती पायात घालावयास लावली. शेटे यांच्या चेहऱ्यावर घेतलेली शपथ पूर्ण केल्याचे मोठे समाधान होते. आगामी काळात आमदार पवार यांची मंत्रीमंडळात वर्णी लागावी, यासाठी आई जगंदबेला साकडे घातल्याचे पवार यांच्यासमोरच शेटे यांनी जाहीर केले. शेटे यांनी पायात चप्पल घालताच उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट करीत त्यांनी केलेला पणाला दाद दिली.
ताज्या बातम्या थेट तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आजच आमच्या 8080944419 या नंबरवर Whatsapp करा आणि लिहा ”Hello News”
हे पण वाचा-
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन
मनसेच्या नव्या झेंड्याचं अनावरण; नव्या झेंड्यावर शिवमुद्राचं
‘राज’पुत्र अमित ठाकरेंचं आज राजकीय लॉन्चिंग?