मोहम्मद अझरुद्दीनवर २० लाखांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

टीम हॅलो महाराष्ट्र । मोहम्मद अझरूद्दीन याच्यासह तीन जणांवर ट्रॅव्हल्स कंपनीची २० लाख ९६ हजार ३११ रूपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोहम्मद शहाब मोहम्मद असे तक्रारदाराचे नाव असल्याची माहिती सिटीचौक पोलिस ठाण्यातून मिळाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुदेश अव्वेकल, मोहम्मद अझरूद्दीन यांच्या नावाने मुजीब खान यांनी दानिश टुर्स अ‍ॅण्ड ट्रॅव्हल्स कंपनीकडून मुंबई-दुबई-पॅरिस व पॅरिस-दुबई-दिल्ली अशी विमानाची तिकीटे बुक केली होती. बुक केलेल्या तिकीटाचे पैसे नंतर देतो असे सांगून मुजीब खान यांनी दिलेला धनादेश वटला नसल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

मोहम्मद शहाब मोहम्मद यावूब यांनी दिलेल्या तक्रारीवरून सुदेश अव्वेकल, मोहम्मद अझरूद्दीन व अझरूद्दीनचा खासगी सचिव मुजीब खान यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास उपनिरीक्षक अमरनाथ नागरे करीत आहेत. दरम्यान, अझरूद्दीनचा खासगी सचिव मुजीब खान हा औरंगाबादचा असल्यामुळे आमचे यात्रा कंपनीशी व्यवहार सुरू होते,असे तक्रारदार मोहम्मद शहाब यांनी सांगितले. दरम्यान मोहम्मद अझरुद्दीन यांनी हे आरोप फेटाळले असून आपल्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.

ताज्या बातम्या थेट तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आजच आमच्या 8080944419 या नंबरवर Whatsapp करा आणि लिहा ”Hello News”

हे पण वाचा-

जेव्हा ‘उद्धव’ रोहित पवार यांच्या हातून चप्पल घालतात..

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन

‘राज’पुत्र अमित ठाकरेंचं आज राजकीय लॉन्चिंग?

Leave a Comment