Wednesday, March 29, 2023

‘अशा महिलांच्या पोटीच बलात्कारी जन्म घेतात!’ कंगना राणावतने घेतला इंदिरा जयसिंग यांच्याशी ‘पंगा’

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | निर्भयाच्या आईने निर्भयाच्या बाबतीत जे काही घडलं ते विसरुन जायला पाहिजे, तिच्या अत्याचाऱ्यांना माफ करायला पाहिजे जसं सोनिया गांधी यांनी राजीव गांधींच्या खुनानंतर खुन्यांना माफ केलं होतं असं वादग्रस्त विधान सरकारी वकील इंदिरा जयसिंग यांनी केलं होतं. त्यावर अभिनेत्री कंगना रणावतने टीकेची झोड उठवली आहे. पंगा या चित्रपटाच्या प्रीमियरवेळी कंगना बोलत होती.

इंदिराज जयसिंह यांच्यावर राग व्यक्त करताना कंगना म्हणाली, “या महिलेला चार दिवस निर्भया प्रकणातील आरोपींसोबत तुरुंगात ठेवायला हवे. या कशा महिला आहेत ज्यांना बलात्कारातील आरोपींवर दया येते. अशा महिलांच्या पोटीच असे नराधम जम्म घेतात ज्यांना बलात्कारी आणि खून्यांप्रती प्रेम असते.”

- Advertisement -

इंदिरा जयसिंह यांच्या विधानानंतर निर्भयाच्या आईने त्यांना चांगलेच सुनावले होते. त्यांनी म्हटले होते की, “इंदिरा जयसिंह कोण आहेत, ज्या मला सल्ला देत आहेत. संपूर्ण देशाची इच्छा आहे की दोषींना फाशी दिली जावी. केवळ यांच्यासारख्या लोकांमुळेच बालत्कार पीडितांना न्याय मिळत नाही.”

ताज्या बातम्या थेट तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आजच आमच्या 8080944419 या नंबरवर Whatsapp करा आणि लिहा ”Hello News”

हे पण वाचा-

मनसेच्या व्यासपीठावर सावरकरांची प्रतिमा; मनसे हिंदुत्वाच्या वाटेवर..

‘राज’पुत्र अमित ठाकरेंचं आज राजकीय लॉन्चिंग?

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन