व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

अंधेरी पोटनिवडणूक रद्द होण्याची शक्यता? नेमकं कारण काय?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेली अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक रद्द होण्याची शक्यता आहे. भाजपने या निवडणुकीतून माघार घेतली असली तरी एका अपक्ष उमेदवाराने ठाकरे गटाविरोधात निवडणूक आयोगकडे तक्रार केली होती, आपल्यावर ठाकरे गटाकडून दबाव आणला जात आहे असा आरोप करत ही निवडणूक रद्द करण्यात यावी अशी मागणी अपक्ष उमेदवार मिलिंद कांबळे यांनी केली होती. त्यामुळे निवडणूक आयोग नेमका काय निर्णय घेणार हे आता पाहावं लागेल.

अंधेरी पूर्व विधानसभेच्या पोटनिवडणुकीतून माघार घ्यावी, यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून माझ्यावर दबाव टाकण्यात आला. तसेच धमकीही देण्यात आल्याचा आरोप मिलिंद कांबळे यांनी केला आहे. त्यामुळे ही निवडणूकच रद्द करण्यात यावी अशा मागणीचे पत्र मिलिंद कांबळे यांनी निवडणूक आयोगाला पाठवलं आहे. त्यामुळे ठाकरे गटाचे टेन्शन वाढलं आहे. निवडणूक आयोगाने अंधेरीच्या पोटनिवडणूकच रद्द केल्यास ठाकरे गटासाठी हा मोठा धक्का मानला जाईल.

दरम्यान, अंधेरी पोटनिवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके याना उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपने आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर ऋतुजा लटके यांचा विजयाचा मार्ग सुकर झाला होता मात्र आता निवडणूक आयोगाने अपक्ष उमेदवार मिलिंद कांबळे यांच्या पत्राची दाखल घेतल्यांनंतर या निवडणुकीत पुन्हा एकदा ट्विस्ट आला आहे.