संतापलेल्या पत्नीने पतीला बदडून पोलीस ठाण्यात काढली वरात; कारण ऐकून तुम्हालाही बसेल धक्का

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नागपूर : हॅलो महाराष्ट्र – नागपूरमध्ये वडील आणि मुलीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. यामध्ये नराधम बापाने पोटच्या अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ करून तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला आहे. तीन आठवड्यापासून सुरू असलेला त्याचा छळ असह्य झाल्याने संतापलेल्या आई आणि मुलीने त्याला बदडून काढत पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे. हि घटना गिट्टीखदान या ठिकाणी घडली आहे. हा आरोपी नराधम बाप ४० ते ४५ वर्षाचा आहे.तो आधी टेलरिंगचे काम करायचा त्याला दारू गांजा असे सर्वच व्यसन आहे. त्याच्या या व्यसनाधीन सवयीमुळे त्याच्याकडे कपडे शिवायला कुणी येत नव्हते. त्यामुळे तो आपली व्यसनाची सवय भागवण्यासाठी मोलमजुरी करतो. त्याला १४ वर्षाची मुलगीदेखील आहे.

पत्नी घरी नसताना किंवा ती रात्रीच्या वेळी गाढ झोपेत असताना हा नराधम बाप या मुलीचा लैंगिक छळ करू लागला. हा सगळा प्रकार २५ मे पासून सुरु होता. रविवारी मध्यरात्री त्याने असाच प्रयत्न केला. पण मुलीने या छळाची आपल्या आईला आधीच कल्पना देऊन ठेवली होती. त्यामुळे रविवारी मध्यरात्री त्याने मुलीसोबत अश्लील चाळे सुरू करताच संतापलेल्या पत्नी आणि मुलीने त्याला बदडून काढले. यानंतर सोमवारी सकाळी या माया लेकरांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून या नराधम बापाला अटक केली आहे.

या नराधम बापाला अमली पदार्थांचे व्यसन तर आहेच यासोबत मोबाईलमध्ये पॉर्न फिल्म बघण्याचीही त्याला सवय आहे. वेळ भेटला कि तो मोबाईलमध्ये अश्लील चित्रफीत बघण्यात दंग असायचा. त्यातूनच त्याला पोटच्या मुलीसोबत अश्लील चाळे करण्याची विकृती जडली असावी असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

Leave a Comment