Anil Babar Death : शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर यांचे निधन

Anil Babar Death
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Anil Babar Death । शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर यांचे निधन झालं आहे. वयाच्या ७४ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांना न्यूमोनिया झाल्याने रुग्णालयात भरती करण्यात आलं होते. मात्र अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. सांगली जिल्ह्यातील खानापूर मतदारसंघाचे ते आमदार होते. एकनाथ शिंदे यांचे विश्वासू अशी अनिल बाबर यांची ओळख होती. आज त्यांचं निधनाने राजकीय वर्तुळातहळहळ व्यक्त केली आहे.

अनिल बाबर यांची राजकीय कारकीर्द – Anil Babar Death

सांगलीतील खानापूर तालुक्यातील गार्डी या गावी अनिल बाबर यांचा जन्म झाला. सांगली जिल्हा परिषद सदस्य ते आमदार अशी त्यांची राजकीय कारकीर्द राहिली. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना असा त्यांचा राजकीय प्रवास राहिला. टेंभू योजनेचे जनक म्हणून त्यांची ओळख होती. सर्व पक्षाच्या नेत्यांमध्ये अनिल बाबर यांचे चांगले संबंध होते. १९९० ला ते पहिल्यांदा काँग्रेसच्या तिकिटावर आमदार म्हणून निवडून आले. त्यानंतर १९९९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि २०१४ तसेच २०१९ मध्ये अनिल बाबर हे शिवसेनेच्या तिकिटावर आमदार झाले. ४ वेळा त्यांनी आमदारकी भूषवली आणि मतदारसंघातील अनेक विकासकामे मार्गी लावली. 2019 मध्ये त्यांनी अपक्ष उभा राहिलेल्या सदाशिव पाटील यांचा पराभव केला होता. 

शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर अनिल बाबर हे सुद्धा काही काळ नॉट रिचेबल होते. मात्र त्यानंतर हे एकनाथ शिंदे यांच्या सोबत असल्याचे स्पष्ट झाले. सुरत ते गुवाहाटीच्या प्रवासातअनिल बाबर हे शिंदेंच्या सोबतच होते. त्यानंतर ठाकरे गटाकडून अपात्रतेप्रकरणी जी नावं दिली, त्या यादीत अनिल बाबर यांचं नाव आघाडीवर होतं. आज त्यांच्या अकाली निधनाने (Anil Babar Death) खानापूर विधानसभा मतदारसंघातील जनता पोरकी झाली आहे.