अनिल देशमुख रुग्णालयात दाखल; खांद्यावर होणार शस्त्रक्रिया

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मुंबईतील जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. खांद्यावरील शस्त्रक्रियेसाठी अनिल देशमुख यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अनिल देशमुख कारागृहात चालताना पडले आणि त्यांच्या खांद्याला मार लागला होता.

अनिल देशमुख सध्या जे जे रुग्णालयातील अस्थिव्यंग विभागात ऍडमिट आहेत. आज त्यांचा एमआरआय येईल. त्यानंतर अधिकची माहिती समोर येईल. जे जे रुग्णालयाच्या मुख्य अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांनी सांगितलं आहे.

100 कोटींच्या वसुली प्रकरणी अनिल देशमुख यांची चौकशी सीबीआयमार्फत होणार आहे. त्यासाठी सीबीआयकडून अनिल देशमुख यांचा ताबा घेतला जाणार होता. सीबीआयने ताबा घेतल्यानंतर देशमुख, वाझे आणि पालांडे यांना चौकशीसाठी दिल्लीला नेले जाईल, अशीही चर्चा होती. मात्र, त्यापूर्वीच अनिल देशमुख यांना जे.जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Leave a Comment