हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | 100 कोटी वसुली प्रकरणात अडकलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे दिवाळीपूर्वीच तुरुंगात जातील असा गंभीर दावा भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला आहे. तसेच उद्धव ठाकररेंचे सरकार हे सामान्य लोकांचे नव्हे तर घोटाळेबाजांचे नेतृत्व करत आहे, अशी घणाघाती टीकाही सोमय्या यांनी केली.
दिवाळीपर्यंत जनतेला वाट पाहावी लागणार नाही. दिवाळीपूर्वीच राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांना तुरुंगात जावं लागेल. त्यानंतर अनिल परब यांचा नंबर लागेल. नंतर हसन मुश्रीफ यांच्यावरही कारवाई होणार आहे,’ असं विधान किरीट सोमय्या यांनी केल.
यावेळी त्यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर देखील टीका केली. परब यांनी राज्यातील साडेबारा कोटी जनतेची माफी मागितली पाहिजे. राज्यात लॉकडाऊन असताना परब यांनी स्वत:चं रिसॉर्ट बांधण्यासाठी थ्री फेसच्या एमएसईबीचं कनेक्शन घेतलं. लॉकडाऊन असताना परब बेकायदेशीरपणे रिसॉर्ट बांधत होते. याची त्यांना लाज वाटली पाहिजे, असे सोमय्यांनी म्हंटल.