हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या लेटर बॉंब नंतर राज्यात खळबळ उडाली आहे. अनिल देशमुख यांनी 100 कोटींचा हप्ता मागितला असा आरोप परमबीर सिंग यांनी केला. दरम्यान बुधवारी रात्री अखेर राज्य सरकार या प्रकरणात एक पाऊल मागे गेल्याचं पाहायला मिळत आहे. राज्य शासनाने जाहीर केलेल्या निर्णयानुसार निवृत्त न्यायमूर्तींमार्फत गृहमंत्र्यांची चौकशी केली जाणार आहे.
राज्य शासनाने जाहीर केलेल्या निर्णयानंतर गृहमंत्री देशमुख यांनी ट्विट केलं. “मी माननीय मुख्यमंत्री महोदय यांना परमबीर सिंग यांनी माझ्यावर जे आरोप केलेत त्याबद्दल चौकशी लावून, “दूध का दूध, पानी का पानी” करावे अशी मागणी केली होती. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी याची चौकशी लावली तर, मी त्याचे स्वागत करीन. सत्यमेव जयते”, असं ते आपल्या ट्विटमध्ये म्हणाले आहेत.
मी माननीय मुख्यमंत्री महोदय यांना परमबीर सिंग यांनी माझ्यावर जे आरोप केलेत त्याबद्दल चौकशी लावून, "दूध का दूध, पानी का पानी" करावे अशी मागणी केली होती. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी याची चौकशी लावली तर, मी त्याचे स्वागत करीन.
सत्यमेव जयते… pic.twitter.com/f2oJjFhO8A— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) March 24, 2021
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कॅबिनेट बैठकीत मुख्यमंत्र्यांसमोर त्यांची बाजू मांडली. माझ्याकडून कोणताही गैरव्यवहार झालेला नाही. मी निर्दोष आहे. माझ्यावरील आरोप धादांत खोटे आहेत, असं अनिल देशमुख यांनी सांगितलं. यावेळी मुख्यमंत्र्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांबद्दल काही महत्त्वाची निरीक्षणं नोंदवली. अधिकाऱ्यांना ओळखण्यात आपण कमी पडतोय का? त्यांच्यावर विश्वास ठेवायचा कसा? अधिकारी फोन टॅप करणार असतील, तर मग मंत्र्यांनी कामं कशी करायची? असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले.
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा