नवी दिल्ली वृत्तसंस्था : महाराष्ट्रातील माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराच्या आरोपाचा सामना करत असताना एक नवीन खुलासा झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार , या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या सीबीआयला देशमुखांच्या मुलांच्या अर्धा डझन कंपन्यांची माहिती मिळाली आहे..देशमुख यांनी या विषयावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. देशमुख यांच्यावर मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी आरोप केले होते.
याबाबत दि इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या माहितीनुसार सीबीआयच्या सूत्रांनी सांगितले आहे की, देशमुख याची दोन मुले सलील आणि ऋषिकेश यांच्या ६ कंपन्यांविषयी माहिती मिळाली आहे. देशमुख यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपाच्या चौकशीदरम्यान सीबीआय दोन्ही मुलांच्या कंपन्यांच्या आर्थिक नोंदींची चौकशी करत आहे. यात कोलकाता स्थित झोडियॅक डीलकॉम प्रायव्हेट लिमिटेडचेही नाव आहे. ही कंपनी कोलकात्यातील मर्केंटाईल बिल्डिंग मध्ये आहे.
विशेष गोष्ट म्हणजे कोलकातास्थित कंपनी ज्या पत्त्यावर चालविली जात आहे त्याला शेल कंपन्यांचे हॉटस्पॉट म्हटले जाते.शेल कंपन्या म्हणजे अशा नोंदणीकृत कंपन्या, परंतु विशेषत: कोणतीही आर्थिक कार्ये करत नाहीत. माहितीनुसार केंद्र सरकारने नेमलेल्या टास्क फोर्सने सन २०१७ मध्ये येथे 400 हून अधिक शेल कंपन्यांची ओळख पटविली होती. नंतर अनेक कंपन्या सरकारने बंद केल्या. सूत्रांच्या माहितीनुसार तथापि, रजिस्ट्रार ऑफ कंपनीच्या आकडेवारीनुसार या इमारतीत अद्याप 100 हून अधिक कंपन्या कार्यरत आहेत. कमीतकमी ३० सक्रिय कंपन्यांचा पत्ता झोडियॅक डीलकॉमच्या पत्त्यावर नोंदविला गेला आहे.