धुळे | शहराच्या विकासासाठी मी सैतानाची मदत घेईन असे वाक्य १५ वर्षापूर्वी वापरले होते. राजवर्धन कदमबांडे यांना सोडून गेलेल्या घाणेरड्या दुषित रक्त पिऊन जगणाऱ्या जळवा आता त्यांच्यापासून वेगळ्या झाल्या आहेत. या पार्श्वभूमीकडे विकासाची दृष्टी असलेल्या कुठलीही व्यक्ती दुर्लक्ष करू शकत नाही. धुळे शहराचा विकास व येत्या पाच वर्षात देशातील सुंदर स्वच्छ पहिल्या १० महानगरात धुळे शहराची गणना व्हावी हे तर माझे जीवनसाध्य आहेत. मी तर शहराच्या विकासासाठी तसेच शहरातील नागरिकांच्या चेहऱ्यावर समाधानाची एक लकीर पाहण्यासाठी माझ्या आयुष्याची बाजी लावण्यास तयार आहे.
कदमबांडे तर शहराचे २ वेळा आमदार होते. ही बाब वेगळी आहे की दुसऱ्यांदा आमदार झाले तेव्हा त्यांनीच मला येरवडा तुरुंगात तेलगीच्या खोट्या केसमध्ये फसवले होते. अर्थात धुळेकर जनतेने संधी मिळताच त्यांचा हिशेब मोकळा केला. अर्थात माझ्या व्यक्तीगत जीवनाचा भाग आहे पण माझ्या व्यक्तीगत आशा आकांक्षा राग लोभ इ. भावनांचा शहराच्या विकास कार्यक्रमात मी कधीही अडथळा ठरू येणार नाही. ज्या जनतेने माझ्याकडून एक रूपयाची अपेक्षा न करता मला ३ वेळा विधानसभेवर पाठविले त्या जनतेचे उपकार माझ्या व्यक्तीगत मान सन्मानापेक्षा लाखो पटीने जास्त आहे. त्या उपकाराचे मूल्यमापन होऊ शकत नाही. माझ्या मनात उचंबळलेल्या भावनांना मुठमाती देऊन शहराच्या विकासासाठी काय आवश्यक आहे. यासाठी माझी तळमळ असेल व हाच माझ्या जीवनाचा प्राधान्यक्रम आहे. अजूनपर्यंत तरी माझ्याकडे अशा युतीचा कुठलाही प्रस्ताव आलेला नाही.
युती करायची की नाही यासंबंधी काय निर्णय घ्यायचा या संबंधीची महत्वपूर्ण चर्चा मी मी.मुख्यमंत्र्याशीच करेल आणि त्यांनी दिलेला निर्णय माझ्यासाठी अंतिम राहिल. धुळे शहराच्या विकासाच्या दृष्टीने जे जे आवश्यक असेल ते मी सर्व करेन असे आ. अनिल गोटे यांनी स्पष्ट केले.