हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रत्नागिरी जिल्ह्यातील मुरुड समुद्रकिनारी असलेल्या साई रिसॉर्टवर आज भाजप नेते कितीत सोमय्या यांनी जाऊन हातोडा मारला. न्यायालयाकडून स्थगिती देण्यात आलयानंतरही सोमय्यांनी कारवाई केल्याने याबाबात शिवसेना नेते अनिल परब यांनी संताप व्यक्त केला. “किरीट सोमय्यांकडून माझ्यावर खोटे आरोप केले जात आहेत. जाणून बुजून त्रास देणे, ठाकरे सरकार असताना प्रतिमा मलिन करणे, हाच त्यांचा उद्देश होता. सोमय्यांनी माझा रिसॉर्टशी संबंध असल्याचा उल्लेख केला म्हणजे ते ब्रम्हदेव नाही,” अशी टीका परब यांनी केली.
अनिल परब यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी रिसॉर्टवरील कारवाईवरून सोमय्यांवर निशाणा साधला. ते म्हणाले की, माझा या रिसॉर्टशी काहीच संबंध नाही. शिंदे गटात प्रवेश करणाऱ्यांवर किरीट सोमय्या बोलत नाहीत. रत्नागिरी जिल्ह्यात २०६० घरे आणि रिसॉर्ट अनधिकृत आहेत. या रिसॉर्टला सरकारने परवानगी दिली होती. परवानगी चुकीची असेल तर मालकाचा दोष किती हे तपासावे लागेल. याच रिसॉर्टवर कारवाई होत असेल, तर बाकीच्यांना देखील हा कायदा लागू होतो..
किरीट सोमय्या यांनी नारायण राणे आणि सुभाष देशमुख यांच्या अनधिृकत घरांवर हातोडा घेऊन जावावे. कोणाची घरे अनधिकृत आहेत, याची यादी आमच्याकडे आहे. मला अडकवण्यासाठी सर्व सुरु आहे. सुपारी घेऊन किरीट सोमय्या काम करतात. शिंदे गटात गेलेल्यांबद्दल बोलण्याची सोमय्यांची हिंमत आहे का? असेल तर दाखवावी,” असे आव्हान परब यांनी दिले.
हजारवेळा आसागितलं तरी खोटी माहिती द्यायची
सोमय्या यांनी केलेल्या आजच्या प्रकरणी त्यांच्यावर मी अब्रुनूकसानीचा दावा दाखल केला आहे. आता फौजदारी दावाही दाखल करणार आहे. माझा रिसॉर्टशी संबंध नाही, हजारवेळ सांगितले आहे. तरी देखील त्याच्याकडून माध्यमांना खोटी माहिती दिली जात आहे.