कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर
कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठात आजी-माजी विद्यार्थ्यांच्यावतीनं शिवमहोत्सव 2020 चे आयोजन करण्यात आलेल आहे. या शिव महोत्सवात सायंकाळी ४ वाजता इंदूरीकर महाराज यांचं कीर्तन कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. या कीर्तनाच्या कार्यक्रमाला कोल्हापुरातील अंधश्रद्धा निर्मूलन समितीसह इतर पुरोगामी संस्थांनी तीव्र विरोध केला आहे. तर दुसरीकडे इंदूरीकर महाराजांचा कार्यक्रम समर्थनार्थ युवा सेना उतरली आहे.
शिवाजी विद्यापीठातील पदवीदान समारंभ होणाऱ्या सभागृहात इंदुरीकर महाराज यांचे कीर्तन होणार आहे. दरम्यान, या कार्यक्रमस्थळी विरोध करण्यासाठी अंनिसच्या सीमा पाटील आणि अवनी संस्थेच्या अनुराधा भोसले या दाखल झाल्या होत्या. तर इंदुरीकर महाराजांच्या समर्थनार्थ युवा सेनेचे मनजीत माने दाखल झाले होते.
यावेळी इंदुरीकर महाराजांच्या कोल्हापूरचा कार्यक्रमावरून आणि युवा सेनेचे पदाधिकारी यांच्यात जोरदार बाचाबाची झाली. अनिसने या कीर्तनाचा कार्यक्रमाला विरोध केला आहे तर हा कार्यक्रम यशस्वी व्हावा यासाठी युवासेना आपली फौज उभी केली आहे.आज ४ वाजता होणाऱ्या इंदुरीकर महाराजांच्या कोल्हापूरातील कार्यक्रमाला कार्यक्रमावरून सुरू झालेला वाद आता कुलगुरू दालना पर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे इंदुरीकर महाराज कोल्हापूरात येतात की नाही हे पाहावे लागणार आहे.
दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.