जळगाव प्रतिनिधी | राज्यात ग्रामपंचायत निवडणुकींचा निकाल आज जाहीर होत आहे. अनेक ठिकाणी दिग्गजांच्या विजय-पराजयाची चर्चा माध्यमांत रंगल्या आहेत. मात्र अशात एका विशेष उमेदवाराच्या विजयाने सर्वांचे लक्ष्य वेधून घेतले आहे. जळगाव जिल्ह्यातील भादली बुद्रुक या गावातील अंजली पाटील यांचा तृथीयपंथी म्हणुन ज्यांचा अर्ज नाकरण्यात आला होता. मात्र आज जाहीर झालेल्या निकालात त्यांचा दणदणीत विजय झाला असल्याचे समोर आले आहे.
अंजली पाटील यांनी वॉर्ड क्रमांक चारमधून सर्वसाधारण महिला प्रवर्गातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. पण, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी तिच्या उमेदवारी अर्जावर हरकत घेऊन तो बाद केला. तृतीयपंथी असल्याने तिला महिला प्रवर्गातून उमेदवारी करता येणार नाही, मतदार यादीतही तिच्या नावापुढे लिंगाचा उल्लेख ‘इतर’ असा असल्याने तिला उमेदवारी नाकारण्यात आली होती. मात्र, अंजलीने हार मानली नाही. तिने आपली सहकारी तृतीयपंथी शमिभा पाटील हिच्या मदतीने न्यायासाठी थेट उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे दार ठोठावले. या ठिकाणी कायदेशीर बाजू मांडल्याने तिचा न्याय मिळाला. न्यायालयाने तिच्या उमेदवारीला हिरवा कंदील दिला. शेवटी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना तिची उमेदवारी मान्य करावी लागली होती.
दरम्यान, तृतीयपंथीय उमेदवाराला उमेदवारी देऊन निवडुण आणणे याला गावाचाही मोठा वाटा आहे. पाटील यांचे सर्वच स्तरातून कौतुक होत असून भादली बुद्रुक या गावात त्यांच्या विजयामुळे उत्साहाचे वातावरण आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.