अहमदनगर प्रतिनिधी | सुशिल थोरात
राज्य सहकारी बँक गैरव्यवहार प्रकरणी आपल्याकडे जे पुरावे आले आहेत, त्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नाव नाही. त्यांचा संबंध नसेल तर त्यांचे नाव आता कसे पुढे आले, याची चौकशी झाली पाहिजे, असे सांगत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पवारांना क्लीन चीट दिली आहे.
अण्णा हजारे म्हणाले, शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी आपल्याकडील पुराव्यांमध्ये शरद पवारांचे नाव नव्हते तरीही त्यांचे नाव यामध्ये कसे आले हे आपल्याला माहिती नाही. पवारांचा जर याच्याशी संबंध नसेल आणि तरीही त्यांचे नाव पुढे आले असेल तर या प्रकरणाची चौकशी व्हायला हवी.
माझ्याकडे असलेल्या पुराव्यांमध्ये शरद पवारांचे नाव नाही हे सत्य आहे. त्यामुळे त्यांच्यावर खोटे आरोप करणे चुकीचे आहे. जे दोषी नाहीत त्यांना विनाकारण अकडवण्यात येऊ नये. उलट माझ्याकडील पुरावे चौकशीसाठी संबंधित अधिकाऱ्यांकडे सादर करुनही त्यांनी याप्रकरणी कारवाई केली नाही. त्यामुळे त्यांच्यावरही गुन्हे दाखल करायला हवेत, अशी मागणीही यावेळी हजारे यांनी केली.
पहा विडिओ-
[youtube https://www.youtube.com/watch?v=PuSJ0OXvQgQ&w=560&h=315]