Monday, January 30, 2023

वाईन विरोधात अण्णा हजारे आक्रमक; उद्यापासून आमरण उपोषण

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्य सरकारने किराणा दुकान आणि सुपर मार्केट मध्ये वाईन विक्रीचा निर्णय घेतल्यानंतर जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सरकारवर सडकून टीका करत सरकारच्या निर्णयाविरोधात आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. तसेच तुमच्या राज्यात जगण्याची माझी इच्छा नाही हे सरकारला सांगा असेही ते म्हणाले.

राज्यात लोकशाही नसून हुकूमशाही आहे. वाईन ही आपली संस्कृती आहे का ?? असा सवाल करतानाच वाईन विक्रीचा निर्णय घेताना जनतेचे मत विचारात घ्यायला हवे होते असे अण्णा हजारे यांनी म्हंटल. जनतेची मान्यता नव्हती तर मग कॅबिनेट ने निर्णय कसा घेतला असा सवाल अण्णा हजारे यांनी केला.

- Advertisement -

मंत्री मंडळाने निर्णय घेतला वाईन ही किराणा दुकानात विक्रीला ठेवल्याने लहान मुलांना व्यसन लागू शकते. यामुळे पिढ्या बरबाद होतील. व्यसनाने लोक बरबाद झाले आणि बालके व्यसनाच्या अधीन गेले तर काय होणार असा सवाल अण्णा हजारे यांनी राज्य सरकार ला केला.