केंद्राकडून शेतकऱ्यांवर गिफ्टचा वर्षाव; गणेशोत्सवाच्या निमित्ताने ‘या’ 4 मोठ्या योजनांची घोषणा

modi government farmers scheme
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| केंद्र सरकार (Central Government) शेतकऱ्यांसाठी योजना राबवण्यावर जास्त भर देताना दिसत आहे. सरकारकडून लागू होणाऱ्या योजनांचा फायदा राज्यातील लाखो शेतकरी घेत आहेत. आता यावर्षी केंद्राने ऐन गणेश उत्सवाच्या काळात शेतकऱ्यांवर गिफ्टच्या वर्षाव केला आहे. केंद्राकडून नुकत्याच चार मोठ्या योजनांची (Government Schemes For Farmers) घोषणा करण्यात आली आहे. या योजनांमुळे शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या मोठी मदत होणार आहे. तसेच ऑनलाइन पध्दतीने माहिती जाणून घेण्याचा फायदा या योजनांमुळे होणार आहे. चला तर मग जाणून घेऊया केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांसाठी कोणत्या 4 योजना आणण्यात आल्या आहेत.

किसान ऋण पोर्टल (Kisaan Rin Portal)

गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर मंगळवारी केंद्र सरकारने किसान ऋण पोर्टल सुरू केले आहे. हे पोर्टल एक शेतकरी कर्ज पोर्टल आहे. या पोर्टलमुळे शेतकऱ्यांना कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे. ज्या शेतकऱ्यांकडे किसान डेबिट कार्ड नाही, त्यांना या पोर्टलचा अति फायदा होणार आहे. या पोर्टलवर शेतकरी आधार कार्ड क्रमांकाच्या आधारे नोंदणी करू शकतात. या पोर्टलच्या माध्यमातून कर्जाचे वितरण, व्याजदरावरील सवलत, योजनांचा फायदा अशा बऱ्याच गोष्टींचा लाभ शेतकऱ्यांना घेता येणार आहे.

विंड्स पोर्टल (WINDS Portal)

गणेशोत्सवाच्या निमित्ताने विंड्स पोर्टलचे उद्घाटन करण्यात आले आहे. या बोर्डाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना निसर्गाच्या संबंधित सर्व माहिती उपलब्ध करून दिली जाणार आहे. शेतीलापूरक असे वातावरण कधी आहे, पावसाची अपडेट, हवामानातील बदल, वादळांची माहिती, अशा सर्व गोष्टी शेतकऱ्यांना या पोर्टलमुळे माहीत होणार आहेत. शेतीसाठी योग्य हवामान असणे आवश्यक असते त्यामुळे या बोर्डाच्या माध्यमातून शेतकऱ्याला निसर्गात होणाऱ्या बदलांची माहिती दिली जाणार आहे.

शेतकरी मित्रानो, तुम्हाला सरकारच्या कोणत्याही योजनांना थेट अर्ज करून आर्थिक लाभ घ्यायचा असेल तर आजच मोबाईल मध्ये Hello Krushi हे अँप डाउनलोड करा. हॅलो कृषी मध्ये तुम्ही १ रुपयाही खर्च न करता कोणत्याही शासकीय योजनांना अर्ज करु शकता. तसेच तुम्ही स्वतःची शेतजमीन मोजणी, सातबारा किंवा फेरफार उतारा, रोजचा सत्राव पिकांचा बाजारभाव, हवामान अंदाज, पशु खरेदी- विक्री असा अनेक सुविधा अगदी फुकट मध्ये मिळत आहेत. यासाठी आज गुगल प्ले स्टोअरवर जाऊन Hello Krushi डाउनलोड करा.

केसीसी इनिशिएटिव (KCC Initiatives)

शेतकऱ्यांना 3 लाखांपर्यंत कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकारने ही योजना आणली आहे. या योजनेला केसीसी इनिशिएटिव असे नाव देण्यात आले आहे. या योजनेची माहिती केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी दिली आहे. केंद्र सरकारने किसान क्रेडिट कार्ड कर्जासाठी 20 हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्याला 3 लाखांपर्यंत कर्ज दिले जाईल, ज्याच्या
व्याजदारावर 3 टक्क्यांची सूट असेल.

घर-घर केवायसी (Door-to-Door KCC)

शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्डचा फायदा उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकारने घर घर केवायसीची मोहीम हाती घेतली आहे. या योजनेअंतर्गत केंद्र सरकार थेट शेतकऱ्यांच्या घरी जाऊन किसान क्रेडिट कार्डची माहिती देणार आहे. यामुळे लाखो शेतकऱ्यांना किसान योजनेबाबत माहिती मिळेल. पी एम किसान योजनेत दरवर्षी शेतकऱ्यांना सहा हजार रुपयांची आर्थिक मदत केली जाते.