पंजशीर । अफगाणिस्तानमध्ये, पंजशीर खोरे वगळता, प्रत्येक ठिकाण तालिबानच्या ताब्यात आले आहे. अहमद मसूदचे लढाऊ, जे पंजशीरमध्ये बंडखोरांचे नेतृत्व करत आहेत, ते तालिबानशी युद्धासाठी तयार आहेत. नॅशनल रेझिस्टन्स फ्रंट किंवा नॉर्दर्न अलायन्सचे नेतृत्व करणारा मसूद म्हणाला की,”आमची युद्धाची तयारी आहे, मात्र जर तालिबान्यांशी मार्ग काढण्यासाठी चर्चा झाली तर ते त्यासाठी देखील तयार आहेत.”
रॉयटर्स या वृत्तसंस्थेनुसार, अफगाणिस्तानमध्ये तालिबानी दहशतवाद्यांना जोरदार लढा देत असलेला बंडखोर नेता अहमद मसूद याने ही घोषणा अशा वेळी केली आहे, जेव्हा तालिबानी दहशतवाद्यांनी त्यांचे हजारो सेनानी पंजशीरच्या खोऱ्यात हल्ला करण्यासाठी पाठवले आहेत. मसूदच्या बाजूने दावा केला की, त्यांनी तालिबानवर हल्ला केला आणि 300 हून अधिक सैनिकांना ठार केले. त्याचबरोबर अनेकांना ओलीस ठेवण्यात आले आहे.
‘पंजशीरचा सिंह’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अहमद शाह मसूदचा मुलगा, अहमद मसूदने रॉयटर्सबरोबर झालेल्या फोनवरील संभाषणात सांगितले की,”आम्ही तालिबानला जाणीव करून देऊ इच्छितो की, संवादातूनच पुढचा मार्ग आहे. तालिबानला पराभूत करण्यासाठी अहमद मसूद एक सैन्य उभे केले आहे जे अफगाण सैन्य, स्पेशल फोर्सेस आणि स्थानिक सैनिकांनी बनलेले आहे. आम्हाला युद्ध सुरू करायचे नाही.”
तालिबानने आपले सैनिक पंजशीरला पाठवले होते
तालिबानने असेही म्हटले आहे की,”बंडखोरी दडपण्यासाठी हजारो तालिबान लढाऊंना पंजशीर खोऱ्यात पाठवण्यात आले आहे.” तालिबानने ट्विटरवर म्हटले आहे की, “स्थानिक अधिकाऱ्यांनी शांततापूर्ण पद्धतीने पंजशीर आमच्याकडे सोपवण्यास नकार दिला आहे. यानंतर आम्ही आमच्या लढाऊंना तेथे नियंत्रण ठेवण्यासाठी पाठवले आहे; याचा एक व्हिडिओ तालिबान समर्थक ट्विटर हँडलवरून देखील नुकताच पोस्ट करण्यात आला आहे.