काबूल । अफगाणिस्तानात दोन दशकांनंतर तालिबान परतला आहे. यानंतर तेथील लोक घाबरले आहेत. भीतीने लोकांना कोणत्याही प्रकारे देश सोडून जायचे आहे. काही लोकांनी गुरुद्वारामध्ये आश्रय घेतला आहे. दरम्यान, काबुलमध्ये असलेल्या गुरुद्वाराचा एक व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये तालिबानचे नेते काबूलमधील गुरुद्वारा साहिबमध्ये पोहोचल्याचे दिसून येते. हा व्हिडिओ दिल्ली शीख गुरुद्वारा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मनजिंदर सिंह सिरसा यांनी शेअर केला आहे. सिरसा यांचे म्हणणे आहे की,”तालिबानने काबूलच्या गुरुद्वारामध्ये आश्रय घेतलेल्या हिंदू आणि शीखांना भेटून त्यांना सुरक्षेचे आश्वासन दिले आहे.” कोणाचाही सूड घेतला जाणार नाही, असे तालिबानने म्हटले आहे.
अफगाणिस्तानात अडकलेल्या भारतीय कुटुंबांनी त्यांच्याशी पंतप्रधान कार्यालयात बोलणी केल्याचेही सिरसा यांचे म्हणणे आहे. तिथून कळले की, अफगाणिस्तानात अडकलेल्या लोकांसाठी सुरू केलेल्या नवीन योजनेअंतर्गत प्रत्येकाचे व्हिसा मंजूर झाले आहेत.
https://twitter.com/mssirsa/status/1428032650262978560?
सिरसा यांचे म्हणणे आहे की,” त्यांनी काबूलमधील गुरुद्वारा समितीचे अध्यक्ष गुरनाम सिंह यांच्याशीही चर्चा केली आहे. त्यांनी सांगितले आहे की,” परराष्ट्र मंत्रालयाची लोकं त्यांच्या संपर्कात आहेत आणि प्रत्येकाचे व्हिसा देखील मंजूर झाले आहेत. आता काबूल सोडण्याची वाट पाहत आहेत.”
असदाबादमध्ये रॅलीमध्ये तालिबानने गोळीबार केला
दरम्यान, पाकिस्तानला लागून असलेल्या अफगाण प्रांताची राजधानी असारबादमध्ये गोळीबार झाल्याचे वृत्त आहे. रॉयटर्स या वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, येथे अफगाणिस्तानच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त काढण्यात आलेल्या रॅलीमध्ये अनेक लोकं अफगाण ध्वज फडकवत होते. तालिबान्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला, ज्यामुळे चेंगराचेंगरी झाली. या हिंसाचारात अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे.
मात्र ठार झालेल्यांना गोळ्या घालण्यात आल्या की, चेंगराचेंगरीत बळी पडले हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. दरम्यान, तालिबानने म्हटले आहे की,”अफगाणिस्तानचा झेंडा आता नव्याने स्थापन झालेल्या तालिबान सरकारद्वारे निश्चित केला जाईल.”
तालिबान या लोकांचा शोध घेत आहे
द न्यूयॉर्क टाइम्सच्या वृत्तानुसार, तालिबान काबुलच्या विमानतळावर जमावासह अमेरिकन आणि नाटो सैन्यासह काम केलेल्या लोकांचा शोध घेत आहे. संयुक्त राष्ट्रांच्या दस्तऐवजात असे म्हटले गेले आहे. दहशतवाद्यांनी त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना शोधण्यात अपयश आल्यास त्यांना ठार मारण्याची किंवा अटक करण्याची धमकी दिली आहे.