पुणे | दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना ४ लाखाची मदत जाहीर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे प्रतिनिधी | पुण्यातील दुर्घटनेत मृत पावलेल्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी चार लाखाची मदत जाहीर करण्यात आली आहे. कोंढव्यात सोमजी पेट्रोल पंपाजवळील आल्कर स्टायलस इमारती नजीक हि घटना घडली आहे. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापना कडून हि मदत जाहीर झाली आहे. संदर्भातील माहिती पुणे पालिका आयुक्त सौरभ राव यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटने बद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे. तसेच त्यांनी या घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांना दिले आहेत. तर या घटने बद्दल विरोधकांनी देखील सरकारला धारेवर धरले आहे. तर या घटनेत दोषी असणाऱ्या बिल्डर आणि पालिका अधिकाऱ्यावर कारवाही करण्यात यावी अशी मागणी देखील विरोधकांनी केली आहे.

दरम्यान पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी देखील घटनेबाबत दु:ख व्यक्त करत घटनेत दोषी असणाऱ्यावर कारवाही केली जाईल असे म्हणले आहे. तर बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी असंघटीत क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांबद्दल सरकारचे धोरण उदासीन असल्याचे म्हणले आहे. तसेच नगरविकास खात्याच्या मंत्र्यांनी शहरात काम करणाऱ्या अशा संघटीत कामगारांकडे लक्ष देण्याची गरज आहे असे सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.

Leave a Comment