पृथ्वीवर आणखीन एक मोठे संकट, ओझोन थराला पडलेय मोठे छिद्र

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाव्हायरसशी संबंधित वाईट बातम्यांदरम्यान येणाऱ्या काही बातम्या लोकांना दिलासा देत होत्या. यामध्ये वायू प्रदूषणाची पातळी कमी होणे, नद्या साफ होणे आणि अंटार्क्टिकावरील ओझोनचा थर दुरुस्त होणे यासारख्या काही बातम्यांचा समावेश होता. आता उत्तर ध्रुवावर आर्क्टिकच्या वरील ओझोन थरात एक मोठे छिद्र असल्याचे आता सांगण्यात आले आहे. शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की हे छिद्र सुमारे १ दशलक्ष चौरस किलोमीटर इतके मोठे आहे. युरोपियन स्पेस एजन्सीने याबाबतची अधिकृत माहिती दिली आहे. अंटार्क्टिकाच्या छिद्रापेक्षा आर्क्टिक वरचे छिद्र खूपच लहान आहे. मात्र तीन ते चार महिन्यांत ते छिद्र २५ दशलक्ष चौरस किमीपर्यंत पसरू शकते असे बोलले जात आहे. जास्त थंडीमुळे आर्क्टिकवर छिद्र तयार झाले आहे. वातावरणात झालेल्या बदलामूळेच आर्क्टिकवर हे छिद्र बनले आहे असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आह.

युरोपियन स्पेस एजन्सीची अधिकृत माहिती
ओझोन थराला एक छिद्र तयार झाले असल्याची माहिती युरोपियन अंतराळ एजन्सीने दिली आहे. ईएसएच्या मते, यापूर्वी उत्तर ध्रुवावरील ओझोनचा थर बर्‍याच वेळा कमी झाला आहे. कोपर्निकस सेंटिनेल -5 पी उपग्रहातील डेटा वापरणाऱ्या वैज्ञानिकांना आर्क्टिकच्या ओझोनच्या थरात तीव्र घट दिसून आली आहे. स्ट्राटोस्फीयरमधील अतिथंड तापमानामुळे ओझोनची पातळी खालावली जाते ज्यामुळे ओझोन थरात ‘मिनी-होल’ होते, असे ईएसएने एका निवेदनात म्हटले आहे. या महिन्याच्या शेवटी हे छिद्र नैसार्गिगरीत्या बंद होईल, अशी ईएसएच्या शास्त्रज्ञांची अपेक्षा आहे. (संदर्भ – http://www.esa.int/)

ओझोनचा थर म्हणजे नक्की काय?
ओझोन हा एक वायू आहे. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून काही अंतरावर ओझोन या वायूचा एक थर नैसर्गिकरित्या तयार झालेलो असतो. या थरालाच ओझोन लेयर असे म्हणतात. हा थर सूर्यापासून येणाऱ्या हानिकारक अल्ट्राव्हायोलेट किरण (यूव्ही-रे) पृथ्वीच्या पृष्ठभागावर येण्यापासून अडवतो. ज्यामुळे पृथ्वीवरील तापमान स्थिर राहते. जेव्हा जेव्हा ओझोन थरात एक छिद्र तयार होते तेव्हा ते अर्टार्क्टिकाच्या वरतीच बनते. येथे प्रदूषणामुळे ओझोनचे प्रमाण कमी झाले आहे, ज्यामुळे अतिनील किरण थेट पृथ्वीच्या पृष्ठभागावर येतात.

कोपर्निकस सेंटील -५ पी उपग्रह काय काम करतो?
ओझोन वायूच्या थराच्या या सर्व अभ्यासामध्ये कोपर्निकस सेंटील -५ पी उपग्रहाचा फार महत्वाचा वाटा आहे. कोपर्निकस सेंटील -५ पी उपग्रह या उष्णकटिबंधीय उपकरणाद्वारे युरोपियन वैज्ञानिक ओझोन थराचा अभ्यास करतात. हा उपग्रह वातावरणातील वेगवेगळ्या वायूंचे प्रमाण परीक्षण करतो. वातावरणातील देखरेखीसाठी हा उपग्रह अतिशय महत्वाचे साधन ठरत आहे.

जास्त थंडीमुळे आर्क्टिकवर छिद्र तयार झाले
उत्तर ध्रुवावरील हवामान मागील वर्षांच्या तुलनेत अनपेक्षितरित्या थंड झाले आहे. दोन्ही ध्रुवामध्ये हिवाळ्यामध्ये ओझोन कमी होतो. अंटार्क्टिकापेक्षा आर्क्टिकवरील ओझोनचा थर अधिक कमी होतो. हे छिद्र अतिशय कमी तापमान, उन्ह, खूप मोठे वायु व्हर्टीसेस आणि पोलमध्ये क्लोरोफ्लोरोकार्बन यांमुळे बनलेले आहे.

ओझोनच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात झाली घट
कोपर्निकस सेंटिएल -५ पी उपग्रहाच्या आकडेवारीच्या आधारे वैज्ञानिकांना असे आढळले की आर्क्टिक प्रदेशात ओझोनच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. यामुळे ओझोन थरात एक छिद्र तयार झाले आहे.

Ozone hole over the Arctic

वैज्ञानिकांना आत्तापर्यंत अनेकदा ओझोन लेयरला लहान छिद्रे दिसली आहेत
ओझोन वायूच्या थराला छिद्र पडणे हि काही नवीन गोष्ट नाही. आत्तापर्यंत अनेकदा वैज्ञानिकांनी अशी लहान छिद्रे पहिली आहेत. मात्र यावर्षी दिसणारे छिद्र नेहमीपेक्षा जास्त मोठ्या आकाराचे असल्याचे युरोपियन वैज्ञानिकांचे म्हणणे आहे. मागील दोन वर्षात अंटार्क्टिकावरील ओझोन छिद्रात चांगली सुधारणा झाली होती. मात्र यावर्षी हे छिद्र मागील वर्षीपेक्षा मोठे झाल्याचे दिसत आहे. मॉन्ट्रियल प्रोटोकॉलच्या अंमलबजावणीमुळे गेल्या काही वर्षांमध्ये ओझोन छिद्रामढे चांगली सुधारणा झाल्याचे वैज्ञानिकांचे म्हणणे आहे. मॉन्ट्रियल प्रोटोकॉल ने जगभरात क्लोरोफ्लोरोकार्बन्सच्या उत्सर्जनावर बंदी घातली आहे.

उत्तर ध्रुव साधारणपणे अंटार्क्टिकासारखा थंड नसतो. यावर्षी बरीच थंडी होती आणि स्ट्रॅटोस्फियरवर एक ध्रुववृत्त तयार झाले. सूर्यप्रकाश थंड हवामानात पोहोचताच ओझोन फिकट होऊ लागला. तथापि, दक्षिण ध्रुवापेक्षा त्याचे प्रमाण बरेच कमी होते.

Antarctica Is Melting Way Faster Than Anyone Expected

यामुळे मानव, प्राणी आणि पिकांचे होईल नुकसान
ओझोन थरातील छिद्र हे लोकांसाठी चिंतेचा विषय आहे. यामुळे आर्क्टिक प्रदेशात उष्णता वाढेल आणि बर्फ वितळण्याच्या गतीमध्ये येथे वाढ होईल. त्याच वेळी, पृथ्वीच्या पृष्ठभागावर थेट अतिनील रेजमुळे, त्वचेच्या कर्करोगासारख्या गंभीर आजाराची प्रकरणे लोकांमध्ये वाढू शकतात. त्वचेच्या कर्करोगाचा आणखी एक घातक प्रकार मेलेनोमाच्या घटनांमध्ये वाढ होऊ शकतो.

एका अभ्यासानुसार, अतिनील किरणोत्सर्गामध्ये १० टक्के वाढ झाल्याने पुरुषांमध्ये १९ टक्के आणि स्त्रियांमध्ये १६ टक्के मेलेनोमा वाढतो. पुली एरिनास, चिली येथे केलेल्या अभ्यासानुसार ओझोन कमी झाल्याने आणि यूव्हीबी पातळीत वाढ झाल्याने मेलानोमा ५६ टक्के आणि मेलेनोमा नसलेल्या त्वचेचा कर्करोग ४६ टक्क्यांनी वाढला आहे. अतिनील किरणोत्सर्गाच्या वाढीचा परिणाम पिकावरदेखील होऊ शकतो.

The Antarctica Factor: Model Uncertainties Reveal Upcoming Sea ...

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “HelloNews”

या बातम्याही वाचा –

Leave a Comment