Salman Khan : सलमान खानच्या हत्येचा कट रचणाऱ्या 4 जणांना अटक; समोर आले पाकिस्तान कनेक्शन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Salman Khan) बॉलिवूडचा भाईजान अर्थात अभिनेता सलमान खानवर आणखी एक हल्ला होणार होता. मात्र, पोलिसांच्या सतर्कतेमुळे या हल्ल्याचा कट आधीच उघडकीस आला आणि या प्रकरणाशी संबंधित ४ जणांना पनवेल पोलिसांनी अटकसुद्धा केली. माहितीनुसार, या चौघांनी पनवेलमध्ये सलमानच्या कारवर हल्ला करून त्याला संपवण्याचा कट आखला होता. मात्र, त्यांचा कट आधीच पोलिसांच्या लक्षात आला आणि त्यांना अटक झाली. मुख्य माहिती अशी की, अटक केलेल्या चारही आरोपींचे बिष्णोई गँगशी कनेक्शन आहे. इतकेच नव्हे तर या कटाचे पाकिस्तान कनेक्शनदेखील असल्याचे समोर आले आहे.

सलमानला संपवण्याचा आणखी एक कट उघडकीस (Salman Khan)

अभिनेता सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटवर गोळीबार झाल्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली होती. या प्रकरणात सामील असल्यानं मुंबई पोलिसांनी अटक केल्यानंतर आता सलमान खानला संपवण्यासाठी आणखी एक कट आखण्यात आला होता असे समोर आले आहे. हा कट आखणाऱ्या ४ आरोपीना पनवेलमधून पोलिसांनी अटक केली आहे.

एका वृत्तानुसार, ‘पनवेलमध्ये सलमान खानवर (Salman Khan) हल्ला करण्यासाठी आरोपींचा पाकिस्तानमधून शस्त्रे मागवण्याचा प्रयत्न होता. या प्रकरणी नवी मुंबई पोलिसांनी कारवाई करून ४ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आणि त्यांना अटकेत घेतले. अटकेत असलेल्या आरोपींची नावे पुढीलप्रमाणे : गौरव भाटीया उर्फ न्हायी, वस्पी खान उर्फ वसीम चिकना, धनंजयसिंह तपेसिंह उर्फ अजय कश्यप आणि झिशान खान उर्फ जावेद खान.

पाकिस्तान कनेक्शन

या प्रकरणाबाबत पोलीस सूत्रांनी काही माहिती प्रदान केली आहे. त्यानुसार, तुरुंगात असलेल्या गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईचा कॅनडात स्थायिक असलेला चुलत भाऊ अनमोल बिष्णोई आणि सहकारी गोल्डी ब्रार यांनी एका शस्त्रास्त्र विक्रेत्याकडून AK-47, M-16 आणि AK-92 खरेदी केल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. दरम्यान, पाकिस्तानने अत्याधुनिक शस्त्रे खरेदी करून बॉलिवूड अभिनेता सलमान खान (Salman Khan) याला मारण्याचा कट रचल्याचे देखील पोलिसांना समजले आणि यानुसार त्यांनी कारवाई केली.

असं होत प्लॅनिंग

वृत्तानुसार, या प्लॅनमध्ये अभिनेता सलमान खानची गाडी रस्त्यात थांबवून किंवा फार्महाऊसवर हल्ला करून त्याला जीवानिशी मारणे असा उद्देश निश्चित करण्यात आला होता. यासाठी लॉरेन्स बिष्णोई टोळीने महिनाभरापासून पूर्ण तयारी केली होती. सलमानच्या पनवेलमधील फार्महाऊसबाहेर गोळीबार करणाऱ्या २ नेमबाजांना नेमण्यात आले होते. (Salman Khan) दरम्यान, गुप्त माहितीच्या आधारे नवी मुंबई पोलिसांनी माहित मिळताना त्यांनी तडक कारवाई केली आणि आतापर्यंत ४ जणांना अटक केली आहे. तरीही अद्याप प्रकरणाचा तपास संपलेला नाही. या प्रकरणी आयपीसीच्या कलम 115, 120 (बी) आणि 506 (2) अंतर्गत पोलिसात FIR दाखल करण्यात आली असून पुढील तपास सुरु राहील.