केंद्राच्या समर्थकांकडून मुस्लिम विरोधी चाल, त्याचा पाया एमआयएम पक्ष : झाकीर पठाण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी 

आठ वर्षापासून मुस्लिमांच्या विरोधात वातावरण करण्याची चाल केंद्राच्या समर्थकांकडून सुरू आहे. त्याच्या पाया एमआयएम पक्षाने घातला आहे. त्यामुळे एमआयएम मुस्लिमांसाठी यम आहे, अशी टिका काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाचे सातारा जिल्हाध्यक्ष झाकिर पठाण यांनी केली आहे. निवडणुका आल्या की मुस्लिम समाजाचा पुळका घेऊन बॅरिस्टर असदुद्दीन ओवैसी बाहेर पडतात आणि कॉग्रसे विरोधात विषारी प्रचार करून भाजपला फायद्या मिळवून देतात, असेही पठाण यांनी स्पष्ट केले.

पठाण म्हणाले, सत्तर वर्षांमध्ये काँग्रेसने काय दिले व पुरोगामी विचारांची काँग्रेस नाही असा अपप्रचार करणारे ओवेसी यांच्या बापजाद्यांनी कॉंग्रेस बरोबर सत्ता का भोगली आहे, त्याचे उत्तर द्यावे. तुम्ही 2013 पर्यंत याच काँग्रेससोबत सत्ता का भोगली, याचाही खुलासा करावा. सत्तेसाठी काहीही करणाऱ्या भाजपच्या इशाऱ्यावर नाचत मुस्लिमांच्या खऱ्या शत्रुंच्या विरोधात न लढता त्यांच्या पायात लोटांगण घालणाऱ्या ओवेसीची नीती आता पश्चिम बंगालच्या मुस्लिमांनी देशातील मुस्लिमांसमोर उघड केली आहे.

त्यामुळे ओवेसींची कूटनीती मुस्लिम समाजाने ओळखली आहे त्यामुळे एमआयएमच्या दिशाभूल करणाऱ्या प्रचाराला मुस्लिम समाज बळी पडणार नाही. मुस्लिम समाज हा भावनिक आहे भोळा आहे त्याच्या भावनेशी खेळ करण्याचा थांबवा नाहीतर मुस्लिम समाज तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही मुस्लिम समाजाला भावनिक करून दिशाभूल करणाऱ्या असदुद्दीन ओवैसी यांनी जाणीव ठेवावी की काँग्रेसच्या राजवटीत लाखोच्या संख्येने महिला रस्त्यावर आंदोलनाला कधी उतरल्या नाहीत. एन आर सी साठी महिलांना शाहीन बाग आंदोलन करावं लागलं नाही. मुस्लिम बांधवांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी बसवणारा पक्ष काँग्रेस पक्ष आहे.

पाच टक्के आरक्षण सुप्रीम कोर्टाने ग्राह्य धरलं ते मुस्लिम समाजाला दिलेले पाच टक्के आरक्षण काँग्रेसनेच आणि माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी दिले आहे. बॅरिस्टर असदुद्दीन ओवैसी हे बॅरिस्टर जीना पार्ट टू आहेत हे आता मुस्लिम समाजाने ओळखायला सुरुवात केलेली आहे

Leave a Comment