कोरोनाविरुद्ध लढाईसाठी विरुष्काच्या जोडीने जमविला रेकॉर्ड तोड निधी; मदतकर्त्यांचे मानले आभार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या जगभरात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढतो आहे. अश्या संकट काळात जो तो मदतीच्या आशेवर जगतोय. दरम्यान भारतीय क्रिकेटर विराट कोहली आणि त्याची पत्नी बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा ने स्वतःहून मदतीचा हात पुढे केला होता. कोरोना विरुद्ध लढ्यासाठी त्या दोघांनी एक मोहीम सुरू केली होती. या मोहिमेत त्यांनी ७ कोटींचे लक्ष ठेवून निधी जमविण्यास सुरूवात केली. मात्र आता या मोहिमेने जवळ जवळ ११ कोटींचा पल्ला पार केला आहे. या मोहिमेत त्या दोघांनीही २ कोटींचे दान केले होते आणि इतरांना शक्य तितके दान करण्याचे आवाहन केले होते. यासाठी विराट आणि अनुष्काने मदतकर्त्यांचे आभार मानले आहेत.

https://www.instagram.com/p/CO10AkMNL5q/?igshid=b1ohw9gj2rqt

या मोहिमेसाठी एम पी एल स्पोर्ट्स फाऊंडेशन ने ५ कोटींची मदत केल्यानंतर ७ कोटींचे लक्ष पार झाले. यानंतर विराटने ११ कोटींचे लक्ष ठेवले आणि आज ते ही पार झाले. ११ कोटी ३९ लाख ११ हजार ८२० रुपये एव्हाना जमा झाले आहेत.

https://www.instagram.com/p/COjycCPgbWi/?igshid=1wyuh3doahtjo

 

याबाबत विराटने म्हंटले की, एकदा नव्हे तर दोनदा आम्ही लक्ष पार केले. ही आनंदाची बातमी शेअर करताना मन भरून आले आहे. भावना व्यक्त करण्यासाठी शब्द अपुरे पडत आहेत. ज्यांनी या मोहिमेत हातभार लावला त्या सर्वांचे मनापासून आभार. आपण सर्व या प्रसंगात एकत्र आहोत आणि एकत्र लढणार आहोत.

https://www.instagram.com/p/CO10Hd5lNXn/?igshid=19nrymrpm89p6

तर याबाबत बोलताना अनुष्का म्हणाली, आपण सर्वांनी दाखवलेल्या एकजुटीेला पाहून मी थक्क झालेय. मला हे सांगताना अभिमान वाटतोय की आपण ठरवलेल्या निधीहून अधिक रक्कम जमा करू शकलो. खरंच आम्ही ठरविलेल्या लक्ष्यापेक्षा अधिक रक्कम जमा झाल्याचे सांगताना अत्यानंद होत आहे. कारण याने अनेकांचे प्राण वाचविले जाऊ शकतात. खरच सर्वांचे मनापासून आभार.. तुमच्या मदतीशिवाय हे सगळ खरच अशक्य होत. खूप आभार.

Leave a Comment