मुंबई | भारतीयांच्या कलेसंदर्भात स्किल इंडियाच्या मोहिमेचा प्रसार करण्यासाठी वरूण धवन आणि अनुष्का शर्मा यांची निवड करण्यात आली आहे. देशात कलेला समोर नेण्यासाठी तसेच कलाकारांच्या बुद्धिमत्तेला चालना मिळावी याकरिता मोहिमेच्या माध्यमातून प्रसार करण्याची जबाबदारी या दोन्ही कलाकारांवर सोपवण्यात आली आहे.
‘सुईधागा’ चित्रपटातून भारतातील तळागाळातील अत्यंत बुद्धिमान कारागीर आणि कामगार अडचणींचा कशा प्रकारे सामना करतात हे दाखविण्यात आले आहे. त्यांच्या या कामामुळे देशातील कारागीर व कामगारांना प्रोत्साहन मिळाले असून त्यामुळेच स्किल इंडियाचे अॅम्बेसिडर म्हणून अनुष्का आणि वरुण यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
वरूण धवन आणि अनुष्का शर्मा यांनी सुईधागा-मेड इन इंडिया या खास चित्रपटाद्वारे आपल्या देशातील कारागीर आणि कलाकारांची शैली सर्वासमोर आणली आहे. त्यामुळे त्यांची निवड करण्यात स्किल इंडियाचे अॅम्बेसिडर म्हणून करण्यात आल्याचे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायूमंत्री आणि कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी म्हटले.