बेंगळुरू । पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला उद्देशून केलेल्या संबोधनात आत्मनिर्भर बना असं आवाहन देशातील नागरिकांना केलं होत. यावेळी त्यांनी लोकल म्हणजेच स्वदेशी वस्तूंचा वापर करण्याचा आग्रह करण्याच आवाहन देशवासियांना केलं होत. दरम्यान, लोकल उत्पादन म्हणजे नेमकं काय किंवा स्वदेशी वस्तूंबाबत अनेकांच्या मनात संभ्रम असतांना. राज्यसभेचे खासदार आणि भाजपचे प्रवक्ता जीव्हीएल नरसिंह राव यांनी जनतेचा हा संभ्रम दूर केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर बना म्हणजे नेमकं काय? या आवाहनाबाबत विचारलेल्या एका प्रश्नाचे उत्तर देताना भारतीय जनता पक्षासाठी भारतात ज्या वस्तूंचे उत्पादन होते ते सर्वच लोकलच आहे. यात भारतातील बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या उत्पादनांचाही समावेश आहे, असे भारतीय जनता पक्षाने स्पष्ट केले आहे. तसेच लोकल उत्पादने खरेदी करण्याबाबत कोणत्याही गाइडलाइन्स देण्यात येणार नाहीत, मात्र देशात उत्पादित चांगल्या दर्जाच्या वस्तू घेतल्या पाहिजेत असे लोकांना भासेल असे वाटते असेही ते पुढे म्हणाले.
याबाबत अधिक स्पष्ट करताना त्यांनी यावेळी शॅम्पू उत्पादनाचं उदाहरण दिलं. समजा एखादा शॅम्पू देशात तयार झाला असेल आणि तो उत्पादन करणारी कंपनी बहुराष्ट्रीय कंपनी असली, तरी देखील हे उत्पादन लोकलच मानण्यात येईल, असे पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना राव म्हणाले. लोकल याचा अर्थ भारतात केवळ भारतीय कंपन्यांनी उत्पादित केलेला माल असा असा होत नाही, तर जे जे भारतात तयार झालेले असेल, ते ते सर्व लोकल असेल असेही त्यांनी स्पष्ट केले. भारतात तयार झालेल्या विविध कंपन्यांच्या वस्तूंमध्ये फरक करता येणार नाही. मात्र, हे खरेदी करा आणि हे करू नका, असे सरकार लोकांना सांगणार नाही. काय खरेदी करावे हा त्या-त्या व्यक्तीचा अधिकार आहे, असेही राव यांनी स्पष्ट केले आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”