मुंबई । कोरोना विषाणूने देशात थैमान घातले आहे. राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या आता ३० हजारच्या वर पोहोचली आहे. महाराष्ट्र पोलीस कोरोना संकटात रस्त्यावर उतरून आपली ड्युटी चोखपणे पार पाडत आहेत. मात्र अनेक पोलीस कर्मचारीही कोरोनाची शिकार झाले आहेत. मुंबईतल्या धारावीत पोलिस स्थानकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल कुलकर्णी आणि एका 57 वर्षीय सहाय्यक उपनिरीक्षकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यानंतर मुंबई पोलिसांनी एक भावूक ट्विट केलं आहे.
https://twitter.com/MumbaiPolice/status/1261610230611312641
कुणी 5 कोटी दिलेत तर कोणी 500 कोटी दिलेत, आम्ही आमचं आयुष्य देतोय… अशी म्हणत मुंबई पोलिसांनी अमोल कुलकर्णी यांचा एक जुना फोटो ट्विटरवर पोस्ट केला आहे. करोनाविरुद्धच्या लढाईमध्ये अमोल कुलकर्णी या सहाय्यक पोलीस निरीक्षकाच्या निधनानंतर त्यांच्या प्रोफाइलवर त्यांनीच पोस्ट केलेला हा जुना फोटो पोलिसांनी ट्विटरवरुन शेअर केलाय. खऱ्या पोलीस कर्मचारी ‘स्वत:पेक्षा कर्तव्य महत्वाचे या ध्येयानेच जीवन जगतात. करोनाविरुद्धच्या लढाईमध्ये सर्वोच्च बलिदान देणारे दिवंगत एपीआय अमोल कुलकर्णी यांच्या खासगी प्रोफाइलवरील ही पोस्ट… अमोल कुलकर्णी यांच्या आत्म्याला शांती मिळो, अशी प्रार्थना मुंबई पोलिसांनी केली आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.




