हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Kisan Credit Card : केंद्र सरकार कडून शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक योजना राबवल्या जातात. किसान क्रेडिट कार्ड (KCC) ही या योजनांपैकीच एक आहे. या द्वारे शेतकऱ्यांना अतिशय कमी व्याजदरात सहजरित्या कर्ज मिळते. यामध्ये जर शेतकऱ्याने वेळेवर पैसे भरले तर त्याला फारच कमी व्याज द्यावे लागते. किसान क्रेडिट कार्ड ही सर्वात स्वस्त व्याजदर असलेली कर्ज योजना आहे.
Kisan Credit Card साठी अर्ज करणे देखील खूप सोपे आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या जवळची ग्रामीण बँक किंवा कोणत्याही सरकारी बँकेतून या योजनेचा लाभ घेता येईल. याअंतर्गत, शेतकऱ्यांना 5 वर्षांत 3 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज घेऊ येते. तसेच या द्वारे शेतकऱ्यांना 1 लाख 60 हजार रुपयांपर्यंतचे कर्ज कोणत्याही गॅरेंटीशिवाय मिळेल.
अगदी सहजरित्या मिळेल कर्ज
गेल्या 2 वर्षांत केंद्र सरकारकडून 3 कोटी शेतकऱ्यांना Kisan Credit Card देण्यात आलेली आहेत. या कार्डच्या सहाय्याने शेतकऱ्यांना शेतीसाठी अगदी सहजपणे कमी व्याजदराने कर्ज घेता येते.
स्वस्त कर्ज
Kisan Credit Card योजने द्वारे, शेतकऱ्यांना 5 वर्षांत 3 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज 9 टक्के दिले जाईल. यानंतर सरकारकडून 2 टक्के अनुदान देखील मिळेल. तसेच, शेतकऱ्याने वेळेवर कर्ज भरल्यास त्याला दोन टक्के अतिरिक्त सवलत देखील दिली जाते. अशा प्रकारे, या कर्जावर फक्त 4 टक्केच व्याज द्यावे लागेल.
गॅरेंटी शिवाय मिळेल 1.6 लाख पर्यंतचे कर्ज
KCC पाच वर्षांसाठी व्हॅलिड आहे. यामध्ये गॅरेंटीशिवाय 1 लाख 60 हजार रुपयांपर्यंतचे कर्ज घेता येते. त्याची मर्यादा आधी 1 लाख रुपये होती. सर्व KCC कर्जावरील अधिसूचित पिके / अधिसूचित क्षेत्र पीक विम्याअंतर्गत समाविष्ट आहेत. Kisan Credit Card
Kisan Credit Card साठी अशा प्रकारे करा अर्ज
यामध्ये अर्ज करण्यासाठी पहिल्यांदा अधिकृत साइट https://pmkisan.gov.in/ वर जावे लागेल.
येथून किसान क्रेडिट कार्डचा फॉर्म डाउनलोड करू शकाल. हा फॉर्म जमिनीची कागदपत्रे, पीक तपशीलांसह भरावा लागेल.
इतर कोणत्याही बँकेतून किंवा शाखेतून किसान क्रेडिट कार्ड बनवलेले नाही. याचीही माहिती द्यावी लागेल.
यानंतर अर्ज भरा आणि सबमिट करा, त्यानंतर संबंधित बँकेकडून किसान क्रेडिट कार्ड मिळेल.
हे बनवण्यासाठी व्होटर आयडी, पॅन कार्ड, आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स इ. कागदपत्रे लागतील.
हे पण वाचा :
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात आज नरमाई !!! नवीन दर तपासा
T20 World Cup नंतर ‘हे’ दिग्गज या फॉरमॅटमधून घेऊ शकतात निवृत्ती !!!
‘या’ Multibagger Stock ने गुंतवणूकदारांना केले मालामाल !!!
Bank of Baroda कडून पेमेंट्सशी संबंधित नवीन नियम आजपासून लागू !!!