Fresher ला ऑफर लेटर देवूनही नियुक्ती रद्द; Wipro, Infosys अशा IT कंपन्यांनी असं का केलं?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील आघाडीच्या आयटी कंपन्या विप्रो, इन्फोसिस, टेक महिंद्राने शेकडो फ्रेशर्सना दिलेले जॉब ऑफर लेटर रद्द केल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. पात्रता आणि कंपनीच्या मार्गदर्शक तत्त्वांचे कारण देत या फ्रेशर्स उमेदवारांचे ऑफर लेटर रद्द करण्यात आले आहे. त्यामुळे फ्रेशर्स उमेदवारांचे स्वप्न भंगले आहे.

अहवालानुसार, शेकडो फ्रेशर उमेदवारांना या कंपन्यांकडून ऑफर लेटर देण्यात आले होती, परंतु सर्वप्रथम त्यांचे जॉइनिंग करण्यास 3-4 महिन्यांचा विलंब करण्यात आला. या उमेदवारांचे जॉइनिंग पुढे ढकलण्यात आले आणि शेवटी त्यांचे ऑफर लेटर रद्द करण्यात आले. विद्यार्थ्यांनी दावा केला आहे की त्यांनी टॉप कंपन्यांमध्ये नोकरीसाठी अर्ज केला होता. मुलाखतीच्या अनेक फेऱ्यांनंतर त्यांची निवडही करण्यात आली, येव्हडच नव्हे तर त्यांना जॉबचे ऑफर लेटर देण्यात आली. परंतु त्यावेळी त्यांना जॉइनिंग होण्यासाठी काही वेळ वाट पाहायला सांगितले होते.

विद्यार्थ्यांनी दावा केला आहे की कंपन्यांनी पात्रता आणि कंपनीच्या मार्गदर्शक तत्त्वांचे कारण देत त्यांचे ऑफर लेटर रद्द करण्यात आले आहे. बिझनेसलाइनच्या रिपोर्टनुसार, कंपन्यांनी पाठवलेल्या मेलमध्ये असे आढळून आले आहे की तुम्ही आमची अकादमी पात्रता पूर्ण करत नाही, त्यामुळे तुमची निवड रद्द करण्यात आली आहे.

वास्तविक, आयटी कंपन्यांनी ऑनबोर्डिंग करण्यास विलंब केल्याची किंवा त्यांची ऑफर पत्रे परत घेण्याच्या बातम्या अशा वेळी येतात जेव्हा जगभरातील आयटी उद्योगात मंदीची चर्चा आहे व्यवसायाच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे अनेक कंपन्यांनी नोकरभरती फ्रीझ केली आहे. अगदी गुगल, फेसबुक आणि मायक्रोसॉफ्ट सारख्या दिग्गजांनी नवीन नोकरभरती रोखून धरल्या आहेत आणि आपल्या टीमला उपलब्ध संसाधनांचा अधिक चांगल्या प्रकारे वापर करण्याचे आदेश दिले आहेत.