गुजरातमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! अर्जुन मोधवाडियांनी केला भाजपात प्रवेश

Arjun Modhwadia
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| लोकसभा निवडणुका (Lok Sabha Election) तोंडावर आल्यामुळे सर्वच पक्षांनी आपल्या कामाचा जोर वाढवला आहे. इंडिया आघाडी असो किंवा महाविकास आघाडी असो यामध्ये जागा वाटपाचा मुद्दा अंतिम टप्प्यावर आला आहे. मात्र या सगळ्यात काँग्रेसला गुजरातमध्ये मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे बडे नेते अर्जुन मोधवाडिया (Arjun Modhwadia) यांनी आमदारकीसह काँग्रेस पक्षाच्या (Congress) सदस्यत्वाचाही राजीनामा दिला आहे. आता त्यांनी काँग्रेसला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

मोढवाडिया यांचा भाजपात प्रवेश

समोर आलेल्या माहितीनुसार, आमदार अर्जुन मोढवाडिया यांना काँग्रेसने राम मंदिर लोकार्पण सोहळ्यावर बहिष्कार टाकल्याचे खटकले होते. तेव्हापासून त्यांच्या मनात काँग्रेस पक्षाविषयी नाराजी निर्माण झाली होती. यानंतरच त्यांनी लोकसभा निवडणूक लागण्यापूर्वी काँग्रेसमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानंतरच त्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष सी. आर. पाटील यांच्या उपस्थितीमध्ये भाजपात प्रवेश केला आहे. मुख्य म्हणजे, राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची भारत छोडो न्याय यात्रा गुजरातमध्ये दाखल होण्यापूर्वीच मोढवाडिया भाजपात गेल्यामुळे याचा मोठा फटका काँग्रेसला बसला आहे.

मल्लिकार्जुन खर्गे यांना पत्र

दरम्यान, काँग्रेसच्या वरिष्ठांनी राम मंदिर प्रतिष्ठापनेवर बहिष्कार टाकल्याचे अर्जुन मोढवाडिया यांना पटलेले नाही. कारण त्यांनी काँग्रेस पक्ष सोडताना मल्लिकार्जुन खर्गे यांना एक पत्र लिहीत याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. आपल्या पत्रात त्यांनी म्हटले आहे की, “प्रभू श्रीराम फक्त हिंदूंसाठी पूजनीय नाही तर ते भारताची आस्था आहेत. प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाचं निमंत्रण नाकारल्यामुळे अनेकांच्या भावना दुखावल्या आहेत. काँग्रेस पक्ष जनतेच्या भावना समजून घेण्यास अपयशी ठरत आहे.”