सातारा | देशाचे पहिले संरक्षण दलाचे प्रमुख बिपिन रावत यांच्या अपघाती निधनानंतर नवीन संरक्षण दलप्रमुख (सीडीएस) म्हणून सध्याचे लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांची 11 डिसेंबर 2021 रोजी वर्णी लागली आहे. सोशल मिडियावर मनोज नरवणे यांचे मूळ गाव सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील नरवणे येथील असल्याचे सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. वास्तविक लष्करप्रमुख नरवणे हे सातारा जिल्ह्यातील नरवणे गावचे नसून ते मूळचे पुणे जिल्ह्यातील असल्याची माहिती समोर येत आहे.
बिपिन रावत यांच्या निधनानंतर देशाच्या संरक्षण दलाच्या प्रमुखपदाच्या नियुक्तीसाठी देशाच्या लष्करप्रमुख पदावर कार्यरत असलेले महाराष्ट्राचे सुपुत्र जनरल मनोज मुकुंद नरवणे यांचे नाव सर्वांत आघाडीवर होते. मनोज नरवणे यांचे आडनाव नरवणे असल्याने ते सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील असल्याची चर्चा सोशल मीडियावर आहे. तसेच यासंदर्भाचे मेसेजही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मात्र, नरवणे कुटुंबीय महाराष्ट्रातील पुणे येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे.
मनोज नरवणे हे जरी सातारा जिल्ह्यातील नसले तरी शेजारील पुणे जिल्ह्यातील आहेत. त्यामुळे संरक्षण दलात महाराष्ट्राचा आवाज असणार आहे. मराठी माणूस तीन्ही दलाचे आता नेतृत्व करणार असल्याने महाराष्ट्रासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे.