Wednesday, March 29, 2023

आर्मी इंटिलिजन्सचा फलटण येथील ॲकॅडमीवर छापा

- Advertisement -

फलटण | आर्मी मध्ये नोकरीला लावतो म्हणून कोरेगाव तालुक्यातील एकाला फलटण तालुक्यामधील एकाने व माण तालुक्यातील एकाने फसवले असल्याबाबतचा गुन्हा फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये नोंदवण्यात आलेला आहे. यामध्ये आर्मी इंटिलिजन्सने वडले येथील ॲकेडमीवर छापा मारला असुन त्यांनी यामध्ये कसुन चौकशी केली आहे.

याबाबत फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन कडून मिळालेली माहिती अशी की, पोलीस भरतीसाठी व आर्मी भरतीसाठी कोडवलकर करिअर अॅकॅडमी, फलटण – शिंगणापुर रोड, वडले येथे अॅडमिशन घेणे करीता फिर्यादी सुनील त्र्यंबक पवार, रा. फडतरवाडी, पो. विखळे, ता. कोरेगाव गेले होते. त्यावेळी फिर्यादीचे 25 वय असल्याने व अॅकॅडमिमध्ये प्रवेश करणेसाठी वयाची अट 21 वर्षे असल्यामुळे अॅकॅडमीत घेत नव्हते. त्यावेळी अॅकॅडमीचे शिक्षक कोडवलकर, ताटे यांनी भेटुन अॅकॅडमीत अॅडमिशन घ्यायचे असेल तर तुझे वय कमी करावे लागेल नाही, आम्हाला वय कमी करून लावण्यासाठी तीन लाख रुपये द्यावे लागतील. नोकरी लागेल या आशेने दि. १२ मे २०२२ रोजी कोलवडकर यांना चाळीस हजार ऑनलाईन तर दि. १६ मे २०२२ रोजी ताटे यांना दोन लाख ६० हजार रूपये रोख दिले.

- Advertisement -

त्यानंतर वय कमी करायचे नाही व आर्मी मध्ये भरती व्हायचे नाही म्हणुन कोललडकर व ताटे यांच्याशी फिर्यादी यांनी संपर्क साधला असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यावेळी फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.